शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांना प्रतिदिन ७५ हजार फी

By admin | Updated: September 7, 2016 05:43 IST

पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्याचा पूर्ण उलगडा करण्यात अद्याप तपास यंत्रणेला यश आले नसले, तरी त्याबाबत न्यायालयात दाखल आरोपपत्राच्या अनुषंगाने

जमीर काझी, मुंबईपुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्याचा पूर्ण उलगडा करण्यात अद्याप तपास यंत्रणेला यश आले नसले, तरी त्याबाबत न्यायालयात दाखल आरोपपत्राच्या अनुषंगाने आवश्यक पूर्तता गृहविभागाकडून करण्यात येत आहे. सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यात सुनावणीच्या प्रति दिवसासाठी विशेष सरकारी वकिलांना ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येच्या गांभीर्यामुळे सरकारी वकिलांना परिणामकारक (महत्त्वाच्या) सुनावणीसाठी इतके शुल्क (फी) दिले जाणार असल्याचे विधि व न्याय विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विशेष तपास पथकाने (एसआयटी) नऊ महिन्यांपूर्वी स्थानिक सत्र न्यायालयात सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या प्रकरणी साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या खटल्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे. ‘खटल्याच्या कामकाजातील त्यांच्या सुनावणीचे शुल्क गृहविभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार, या केसच्या अनुषंगाने दंडाधिकारी, जिल्हा व सत्र आणि उच्च न्यायालयात चालणाऱ्या प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी दिवसाला ७५ हजार रुपये फी दिली जाणार असल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामकारक सुनावणीच्या दिवसांची संख्या निश्चित करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.