शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७४वर्षीय वृद्धाने सहा जणांना उडवले

By admin | Updated: January 11, 2016 03:25 IST

७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत सहा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत.

मुंबई : ७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत सहा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीपद पंजाबी असे या वृद्धाचे नाव असून, अंधेरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.अंधेरी परिसरात राहत असलेला पंजाबी हा एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील तेली गल्लीतून टोयोटा कारमधून भरधाव वेगाने जात असताना त्याचा कारवरचा ताबा सुटला. या वेळी रिक्षाची वाट बघत उभ्या असलेल्या कुटुंबीयांतील चौघांसह दोन पादचाऱ्यांना ठोकरून पुढे जात त्याच्या कारने लोखंडी खांबाला धडक दिली. घटनास्थळाहून पळ काढत असताना स्थानिकांनी त्याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले गुप्ता कुटुंबीय मरोळ येथील रहिवासी आहेत. या अपघातात धनजी गुप्ता (३८), गीता धनजी गुप्ता (३७) आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासह धर्मेंद्र पांडे आणि विनय पांडे हे पादचारीही जखमी झाले. घरी जाण्यासाठी ते रिक्षाची वाट पाहत असताना पंजाबीच्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये आरोपी पंजाबीही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरू असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)