शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्त ७३३ गावांत स्वच्छता अभियानाचा गजर

By admin | Updated: December 28, 2016 18:24 IST

नवीन वर्षात अमरावती विभागातील हागणदारीमुक्त ७३३ गावात स्वछता अभियान राबविण्यात येणार

हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 28 - नवीन वर्षात अमरावती विभागातील हागणदारीमुक्त ७३३ गावात स्वछता अभियान राबविण्यात येणार असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून नवीन वर्षात अमरावती विभागात स्वच्छता अभियानाचा गजर होणार आहे. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास राज्यात नवीन ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे या अभियानाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली होती. या अभियानामुळे राज्यातील अनेक गावे स्वच्छ होवून आरोग्याचा नवा आदर्श ठेवण्यात आला होता. त्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गंत हागदारीमुक्त झालेल्या गावांसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस  पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता प्रथम बक्षीस २५ हजार रूपये ऐवजी १ लाख, व्दितीय १५ हजार ऐवजी ५० हजार,  तृतीय १० हजारऐवजी २५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात येणार आहे. तर बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सहभागी सर्वाधिक २३५ हागदारीमुक्त ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १५४, यवतमाळ जिल्ह्यातील १४१, अकोला जिल्ह्यातील १०३ व वाशिम जिल्ह्यातील १०० हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीपैकी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव दाखल केलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात  येणार असून प्रथम, व्दितीय व तृतीय ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.