शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

‘७३० दिवस बालसंगोपन रजा द्या’

By admin | Updated: February 27, 2016 02:16 IST

महिला शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे ७३० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महिला शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे ७३० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे; शिवाय खासगी कंपनीत काम करणाऱ्या स्त्रियांनाही किमान १८० दिवसांची भरपगारी रजा देण्यात यावी, असे आवाहन शिक्षक सेलने केले आहे.महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी केंद्राप्रमाणेच राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ७३० दिवसांची बालसंगोपन रजेची घोषणा करावी, अशी मागणी शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी केली आहे. सुळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या महिलांना सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स १९७२नुसार १८० दिवस प्रसूती रजा अधिक ७३० दिवस बालसंगोपन रजा मिळते. बालसंगोपन रजा ही मूल १८ वर्षांचे होईपर्यंत संबंधित महिला कर्मचारीला गरजेनुसार घेता येते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही शासनातील महिला कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची भेट द्यावी.खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे १८० दिवसांची भर पगारी रजा मिळत नसल्याची बाबही शिक्षक सेलने निदर्शनास आणली आहे. १८० दिवस प्रसूती रजा दूरच मात्र काही ठिकाणी महिलांना तीन महिने आणि काही ठिकाणी बिनपगारी रजा घ्यावी लागत आहे. परिणामी, बाळंतपणानंतर एकतर महिलेला नोकरीला मुकावे लागते किंवा लहान बालकांना घरी ठेवून नोकरीत रुजू व्हावे लागते. त्यामुळे रजा नाकारणाऱ्या मालकांवर मॅटर्निटी बेनिफिट्स कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी शिक्षक सेलने केली आहे. (प्रतिनिधी)बालसंगोपन रजेचे फायदे!बालक आजारी असेल किंवा नोकरीमुळे आई पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे संवादाचा अभाव होऊन बालके अबोल होतात. अनेकवेळा बालके एकलकोंडी बनतात. त्यामुळे बालसंगोपन रजेचा वापर करून संबंधित महिलेला बालकांना वेळ देता येतो. बालकाच्या आजारपणातही महिलेला त्याची काळजी घेता येते.