शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

७३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: September 12, 2015 00:09 IST

सातारा तालुका : पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांचे कौतुक

सातारा : गट-तट निर्माण होऊन वादाला तोंड फुटते. यातूनच पुढे भांडण तंटा वाढत जातो, त्यामुळे गावातील ऐक्य अबाधित राहावे, यासाठी शासनाने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला यंदा जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ सातारा तालुक्यामध्ये तब्बल ७३ गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आल्याने प्रशासनाने या गावांची विशेष नोंद घेतली आहे.गावात ऐकी राहावी, यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना पुढे आली. ज्या गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये गणेशोत्सवामध्ये वादावादीचे प्रसंग घडलेच नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संकल्पनेला शासनस्तरावरून गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळू लागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सातारा तालुक्याने ‘एक गाव एक गणपती’ योजनेत चांगला सहभाग घेतला आहे. शहर पोलीस ठाणे, सातारा तालुका आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ७३ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. या गावांना दरवर्षी ‘गणराया अ‍ॅवॉर्ड’मध्ये शासनाकडून गौरविण्यात येते. (प्रतिनिधी)या गावांचा समावेश...-‘एक गाव एक गणपती’मध्ये सावली, अंगापूर वंदन, निगडी, केसुर्डी, परळी, आकले, आसले, शेंद्रे, कुरूण, मस्करवाडी यांसह ७३ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी सातारा तालुक्यामध्ये ५३ गावांनी सहभाग घेतला होता. मात्र, यंदा या योजनेत सहभाग घेण्यासाठी प्रशासनाने जनजागृती केल्याने ही संख्या ७३ वर पोहोचली.पोलिसांचा ताण कमी!--दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला कुठे तरी वादावादी झाल्याचे ऐकायला किंवा पाहायला मिळतेच; मात्र ज्या गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये वादावादीचे प्रकारच घडले नाहीत. त्यामुळे या गावांमध्ये पोलिसांना कसल्याही प्रकारचा बंदोबस्त अथवा मिरवणुकीमध्ये जादा कुमक पाठविण्याची कधीच गरज पडली नाही.गावकऱ्यांचा होतोय खर्च कमी गणेशोत्सवामध्ये वर्गणी देण्यावरूनही मोठे वादंग निर्माण होत असते; परंतु ‘एक गाव एक गणपती’ योजना ज्या गावांनी राबविली. त्या गावकऱ्यांनी गणेशोत्सवामध्ये आमचा खर्च कमी झाला असल्याचे गणेश मंडळांच्या बैठकीत कबुल केले होते. इतर गावांनीही या गावांचा आदर्श घेऊन या संकल्पनेची मुहूर्तमेढ भक्कम करावी.