शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा ७२ सूत्री कार्यक्रम

By admin | Updated: May 17, 2015 01:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरील आपले ‘कंट्रोल’ सुटू नये याची पूर्ण काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेतली जात आहे.

भागवत-शहा भेट : ४३ सूचनांवर एकमत, २९ मुद्यांवर मतभेदनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरील आपले ‘कंट्रोल’ सुटू नये याची पूर्ण काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेतली जात आहे. संघाची मोदी सरकारसोबत सातत्याने चर्चाही सुरू आहे. संघाने विविध आर्थिक विषयांचा समावेश असलेली ७२ मुद्यांची यादी मोदी सरकारला सोपविली असून यापैकी ४३ विषयांवर संघ व सरकारमध्ये एकमतही झाले आहे. मात्र, अजूनही २९ मुद्यांवर मतभेद कायम आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असता भागवत यांनी मतभेद असलेल्या २९ मुद्यांवर आपली परखड भूमिका मांडली. संघाने शहांना कुरवाळलेही आणि काय करावे, याबाबत डोसही पाजले. शहा यांनी तब्बल दोन तास मोहन भागवत यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या वेळी संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे देखील उपस्थित होते.या बैठकीत संघातर्फे विविध सूचना मांडण्यात आल्या. भूमी अधिग्रहण कायदा, थेट विदेशी गुंतवणूक या विषयांवर संघ पूर्णपणे मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. संघाने वेळोवेळी या विषयावर आपले मत सरकारच्या प्रतिनिधींकडे मांडले आहे. भूमी अधिग्रहण कायद्यात सामाजिक मूल्यांकनाच्या मुद्यावर संघ आग्रही असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत यांनी शहा यांना या मुद्यावर सरकारची प्रतिमा जपण्याचा व नागरिकांचा कमीत कमी रोष ओढवून घेण्याचा सल्ला दिला. शहा सायंकाळी विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. यानंतर भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्ता संमेलनात बोलताना दत्तात्रय होसबळे यांनी संघ व मोदी सरकार यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सूतोवाच करीत संघ मोदी सरकारच्या एकूणच कारभारावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे संकेत दिले. या मेळाव्यात होसबळे म्हणाले, केंद्रात सत्तापरिवर्तनानंतर या एक वर्षात सर्वकाही बदलले असे नाही, मात्र, परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सर्व बाबतीत आम्ही समाधानी नाही; पण कामाची दिशा बरोबर आहे, असेही ते म्हणाले.एफडीआयबाबत जे काही समोर आले त्यानंतर आपण स्वत: निर्मला सीतारामन यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले, असेही त्यांनी सांगितले.च्गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूर येथे येऊन भागवत यांची भेट घेतली. रविवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर संघ मुख्यालयात जाणार आहेत.च्भागवत यांनी शहा यांना या मुद्यावर सरकारची प्रतिमा जपण्याचा व नागरिकांचा कमीत कमी रोष ओढवून घेण्याचा सल्ला दिला. रस्त्यावर उतरण्यापूर्वी संघाकडे या !च्कोणत्याही प्रश्नासाठी, मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यापूर्वी संघाकडे या. आपल्या समस्या संघाच्या निदर्शनास आणून द्या. आम्ही सरकारशी चर्चा करून उपाययोजना करू, असे आवाहन होसबळे यांनी भारतीय मजदूर संघाला केले.इंधन दरवाढ आणि भूमिसंपादन कायद्याच्या निषेधार्थ शनिवारी युवक काँग्रेसने वर्धा मार्गावरील साई मंदिराजवळ अमित शहा यांना काळे झेंडे दाखविले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बन्टी शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.परखड मत : भूमी अधिग्रहण कायदा, थेट विदेशी गुंतवणूक या विषयांवर संघ पूर्णपणे मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. संघाने वेळोवेळी या विषयावर आपले मत सरकारच्या प्रतिनिधींकडे मांडले आहे. च्सरकार बदलले असले तरी अधिकारी तेच आहेत. त्यामुळे सर्वकाही ठीक व्हायला थोडा वेळ लागेल. आपल्याला सरकारसोबत संघर्ष करायचा नसून प्रतिसादात्मक सहकार्य ठेवायचे आहे. च्आपण आपल्याच लोकांच्या भूमिकेवर संशय घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.