वसंत भोईर, वाडा - वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतेक ग्रामपंचायतींनी जलस्वराज्य योजना घेतली असली तरी निकृष्ट दर्जाचे काम अन् त्यात ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला असून या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल्स, शीतपेय बनवणार्या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्च महिन्यापासूनच नद्यांतील पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर पाणीटंचाई जाणवत असल्याने खाजगी कूपनलिकेतून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. कोंढले (हंडीपाडा), चिखले (चिंचपाडा), सावरखांड, चेंदवली, डोंगगरपाडा, बोलखतरपाडा, तणोशी जामघर (कातकरीपाडा), वेहरोली (बोंद्रे आळी), कोंढले (रावतेपाडा), नांदणी (तांडबमाळ), गायगोढा (देऊळपाडा), गोºहाड, केळठण (सुदारपाडा), मांडवा (बालशेतपाडा), गारगाव-टोपलेपाडा, कातकरीपाडा, उज्जैनी (आंबेपाडा), वसराळे-नवापाडा, चारणवाडी, मांगरुळ आदी ७२ गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्यात जलस्वराज्य योजनेतून वेहरोली, कोना, कोंढला, आंबिस्ते आणि मोज तर आदिवासी उपयोजनेतून गुंजकाही, मांडवा, नारे, गोराड, दाभोण या पाच गावी पाण्यासाठी अंदाजे दीड कोटी खर्च झाला़ परंतु हा सर्व पाण्यात गेल्यात जमा आहे. येत्या आठ दिवसांत उपाययोजना केली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा कोंढले येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
७२ गावपाड्यांंत तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: May 16, 2014 01:24 IST