शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

७२ कोटींचे इफेड्रीन समुद्रात फेकले!

By admin | Updated: April 29, 2016 07:13 IST

सुमारे ७२ कोटींचे १८० किलो इफेड्रीन उरणजवळच्या समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जितेंद्र कालेकर,

ठाणे-सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड’ कंपनीवर ठाणे पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर हरदीप गिल आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे ७२ कोटींचे १८० किलो इफेड्रीन उरणजवळच्या समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामीची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा या संपूर्ण प्रकरणात कितपत सहभाग आहे, याची चाचपणी सुरु असून तिचीही चौकशी होणार आहे.ठाणे पोलिसांनी १४ एप्रिलला सोलापूरच्या कंपनीवर धाड टाकून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी यांना अटक केली. त्याची माहिती मिळताच शिपिंग कंपनीचा क्रेडिट अ‍ॅण्ड फॉरवर्डींग मॅनेजर हरदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे इफेड्रीन समुद्रात नष्ट केले.इफेड्रीनच्या तस्करीच्या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार पुनित श्रींगीने परदेशात पाठविण्यासाठी शिपिंग कंपनीचा संचालक सुब्रमण्यमकडे १८० किलो इफेड्रीन दिले होते. सुब्रमण्यमने हा माल नवी मुंबईतील हरदीपकडे दिला होता. त्याने तो त्याच्या गाडीत ठेवला होता. माल परदेशात पाठविण्याची तयारीही पूर्ण झाली होती. परंतु सोलापूरच्या कंपनीत पोलिसांचे धाडसत्र सुरू झाल्याने त्यांचा डाव फसला.सुमारे दोन टन अमली पदार्थ यापूर्वी परेदशात पाठविल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर हरदीपची आणखी एक कार नवी मुंबई परिसरातून पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने जप्तकेली आहे.धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना ठाणे जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.>नव्याने धाडसत्रपुनितच्या विरार आणि मुंबई तसेच हरदीपच्या नवी मुंबईच्या घरात ठाणे पोलिसांनी धाडसत्र राबविले. रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते.कारवाईचा तपशील सांगणे उचित होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुनितच्या घरी त्याचे वडील होते. तर त्याची आई आणि भाऊ हे दुसरीकडे वास्तव्याला आहेत.>तपासाला नवे वळणअभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी यांचा घटस्फोट झालेला आहे. मात्र पोलीस तपासामध्ये नाव आल्याने तिचीही चौकशी करणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.विकी गोस्वामीबरोबर आरोपींच्या केनियामध्ये बैठका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक चौकशीत तरी ममता कुलकर्णीशी या आरोपींचा काही संबंध आला नसल्याचे सिंग यांनी सांगितले.