शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नोटा मंदीमुळे हॉटेल्स, बार व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम

By admin | Updated: November 16, 2016 16:25 IST

देशभरात हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने कृत्रिम चलन मंदी निर्माण झाल्याने त्याचा ७० टक्यांहुन अधिक परिणाम हॉटेल

राजू काळेभाईंदर, दि. १६ - देशभरात हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने कृत्रिम चलन मंदी निर्माण झाल्याने त्याचा ७० टक्यांहुन अधिक परिणाम हॉटेल, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट, लॉजिंग व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर झाल्याचे महाराष्ट्र राज्य हॉटेल्स असोशिएशनचे संयुक्त सचिव दुर्गाप्रसाद सॅलियन यांनी सांगितले आहे. देशभरातील हॉटेल्स, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट व वाईन शॉप्समध्ये केंद्र सरकारने रद्द केलेल्या जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्विकारणे बंद झाले आहे. त्यातच नव्याने चलनात दाखल झालेल्या दोन हजारांच्या नोटा सुट्या पैशांअभावी स्विकारण्यात येत नाहीत. यावर पर्याय म्हणुन डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर करण्याचा निर्णय घेतला तरी तुर्तास पैशांचा वापर (विथड्रॉवल) मर्यादित केल्याने तेसुद्धा वापरणे कठी झाल्याने पुरेशा ग्राहकांअभावी वरील व्यवसायाची ठिकाणे ओस पडली आहेत.गावात दारु बंदी करण्यासाठी किमान ५० टक्के मतदान आवश्यक ठरत असले तरी यंदा जुन्या हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने मद्यपींकडुनच बार व वाईन शासॅप्समधील बाटली आडवी झाली कि काय, असा प्रश्न सध्या चालकांना पडु लागला आहे. बाहेरुन येणारे पर्यटक व्यावसायिकांनी काही दिवसांपुर्वीच बुकींग केलेली हॉटेल्स व लॉज ग्राहकांकडुन बुकींग रद्द झाल्याने ओस पडली आहेत. सरकारने नोटा रद्द करण्यापुर्वी पुरेशी व्यवस्था करुन ठेवणे अपेक्षित असतानाही निर्मान झालेली कृत्रिम चलन मंदीचा फटका या व्यवसायांना बसु लागला आहे. नोटा रद्दचा निर्णय जाहिर झाल्यानंतर परिस्थिती ठिक होती. परंतु, सरकारने सर्व व्यावसायिकांना जुन्या नोटा स्विकारण्यास मनाई केल्याने कृत्रिम आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे. यामुळे हे व्यवसाय डबघाईला आल्याने त्यातील कामगारांना वेतन कसे द्यायचे, असा प्रश्न सध्या चालकांना पडला आहे. त्यातच काही धनदांडग्यांनी आपले काळे धन वटविण्यासाठी कामगारांना दोन ते तीन महिन्यांचे वेतन दिल्याचे बोलले जात असले तरी बार व वाईन शॉप्समधील कामगारांना तसे कोणतेही वेतन देण्यात आले नसल्याचा दावा त्यांच्या संघटनांकडुन करण्यात येत आहे. हि कृत्रिम आर्थिक चणचण त्वरीत दूर न झाल्यास आर्थिक व्यवस्था सुरुळीत होईपर्यंत एकतर कामगारांची कपात करावी लागणार. अथवा काही काळापुरता हे व्यवसाय बंद करावे लागणार असल्याचे संकेत सॅलियन यांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले, हजार, पाचशेच्या नोटा रद्द केल्याने उद्भवलेल्या प्रचंड चलन मंदीचा परिणाम सर्वच व्यवसायावर होत असला तरी वरील व्यवसायांना त्याचा सर्वाििधक फटका बसत आहे. काळे धन व भ्रष्टाचार संपविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो त्या क्षेत्रापर्यंत मर्यादित असणे अपेक्षित होते. यात मात्र सर्वचजण भरडले जात आहेत. हि परिस्थिती लवकर सुधारणे अपेक्षित असुन तसे न झाल्यास देशभर आंदोलने उभी राहण्याची शक्यता आहे.