शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

सहा महिन्यांत ७0 बळी

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास २५0 जण जखमी झाले आहेत. रविवारी शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग तयार करण्यात आला. २00२ मध्ये ९४.५ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील चौदा वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे २00२ ते २0१२ या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल १७५८ अपघात घडले आहेत. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या सत्तरच्या घरात गेली आहे, तर जवळपास अडीचशे जण कायमचे जायबंदी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी एमएसआरडीसी, महिंद्रा आणि महिंद्रा लि. तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात फेब्रुवारी २0१६ मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकत्रित सहकार्यातून पुढील तीन-चार वर्षांत महामार्गावरील अपघातांत मृतांची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु मागील सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघात आणि त्यातील मृतांची संख्या पाहता हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.>मुंबई-पुणे महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत अभिनेत्री भक्ती बर्वे, अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे या मराठी कलावंतांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे २00२ ते २0१२ या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल १७५८ अपघात घडले आहेत.>अपघातांचा तपशील२९ एप्रिल २0१६: खोपोली एक्झिट वळणावर कंटेनरची मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप व्हॅनला धडक, २ जण ठार१७ मार्च २0१६: महामार्गावरील अडोशीजवळ खासगी बसची दुभाजकाला धडक, २ ठार, १५ जण जखमी१६ मे २0१६: भरधाव एसटी बसची झाडाला धडक. दुपारी पावणे तीनची घटना. १५ प्रवासी जखमी२ जून २0१६: भरधाव कारची रस्ता दुभाजकाला धडक, ३ ठार, तीन जखमी. अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील ठाणे येथील रहिवासी होते.२ जून २0१६: खासगी लक्झरी बसची ट्रकला धडक, पहाटे घडलेल्या या अपघातात ५ ठार, १६ जखमी५ जून २0१६: महामार्गावरील शिवकर गावाजवळ लक्झरी बसची स्विफ्ट आणि इनोव्हा गाडीला धडक, १७ मृत, ४७ जखमी.