शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेणा जलाशयात नाव उलटून 7 तरुण बुडाले

By admin | Updated: July 10, 2017 06:49 IST

अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी सायंकाळी पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणे त्यांच्याच जिवावर बेतले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 - अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी सायंकाळी पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणे त्यांच्याच जिवावर बेतले. एकाच भागात जास्त भार झाल्यामुळे डोंगा असंतुलित होऊन उलटली. परिणामी 7 जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. या नावेत 11 जण होते. त्यातील चौघा जणांना वाचवण्यात यश आलं असून, रात्री उशिरा एकाचा मृतदेह सापडला.कळमेश्वर पोलिसांना या दुर्घटनेची माहिती तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळाली. पण त्यांनी लागलीच बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. रात्री 9.30पर्यंत तीन तरुणांना वाचविण्यात त्यांना यश आले. तर राहुल जाधव याचा मृतदेह हाती लागला.कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधे गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली. अतुल बावणे याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता इतर 10 जण जलाशयात बुडाले.>शोधकार्य सुरू अतुल काठावर आल्यानंतर त्याने इतरांना नाव उलटून तरुण बुडाल्याची माहिती दिली. अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या ताफ्याकडून रात्रीपासून शोधकार्य सुरू आहे.