शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुसद अपघातात ७ ठार

By admin | Updated: April 21, 2016 05:10 IST

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना उमरखेड मार्गावरील साई मंदिरसमोर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

पुसद (यवतमाळ) : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना उमरखेड मार्गावरील साई मंदिरसमोर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच तर दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत तालुक्यातील हर्षी आणि चिलवाडीचे असून या अपघाताने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शेषराव नारायण काळे (४५), युवराज तुकाराम गुव्हाडे (२२), बाळू तुकाराम गुव्हाडे (३५), यादव साहेबराव ढाकरे (२२) सर्व रा. हर्षी, विलास राजाराम काळे (२२), खंडू सखाराम तांभारे (२१), रवी नारायण कऱ्हाळे (२३, सर्व रा. चिलवाडी ता. पुसद) अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील हर्षी येथील चौघे जण दुचाकीवरुन पुसदकडे येत होते. तर शहरालगतच्या चिलवाडी येथील तिघे जण दुचाकीने खर्षी या गावाकडे जात होते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. ट्रॅक्टर चालकानेही करकचून ब्रेक मारल्याने ट्रॅक्टरही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी अवस्थेत पडून होते. त्यांना तत्काळ पुसदच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुसद शहरात अलिकडच्या काळात झालेला हा भीषण अपघात असून ट्रॅक्टर चालकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)