शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

दहा वर्षातील स्थिती : नुकसानीची ८ हजार प्रकरणे दाखल, भरपाईपोटी पावणेदहा कोटींचे वाटप

अनंत जाधव -सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींनी गेल्या दहा वर्षात, म्हणजेच सन २००४ पासून आजपर्यंत सात जणांचे बळी घेतले आहेत, तर १५ जणांना जखमी केले आहे. हत्ती नुकसानग्रस्तांची ७,९०६ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाली असून, नुकसान भरपाईपोटी पावणेदहा कोटी रुपये रक्क्कम अदा करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हत्तींचे वास्तव्य आहे. त्यापैकी एक कुडाळ तालुक्यात, तर दोन हत्ती कणकवली तालुक्यात असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.सन २००२ ते ०३ च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात या हत्तींनी अर्ध्याअधिक जिल्ह्यात आपले साम्राज्य पसरवले असून प्रत्येक तालुक्यात नुकसानी करत हत्तींचा कळप पुढेच्या ठिकाणी जातो. सध्या हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे व कणकवली तालुक्यातील डामरे-सावडाव भागात वळवला आहे. या ठिकाणी हत्तींनी भातशेती व केळीबागायतीचे प्रचंड नुकसान केले आहे. आतापर्यंत या हत्तीना परतविण्यासाठी वनविभागाने नवनवीन उपाय केले, मोहिमा राबवल्या. पण हे सर्व उपाय अपुरे पडले असून हत्तीनी एक प्रकारे वनविभागावर विजयच मिळवला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यानंतर या हत्तीनी दोडामार्गमधुन नुकसान सत्रास सुरूवात केली. तर पहिला बळी शिरंगे येथील शंकर बाळा गावडे यांचा १० एप्रिल २००४ मध्ये घेतला. तेव्हापासून हत्ती हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ७ जुलै २००७ पर्यंत ७ वर जाऊन पोहोचली आहे. तर जखमीची संख्या १५ च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये बुधवारी हत्ती हल्ल्यात जखमी झालेल्या वेताळबांबर्डे येथील वैभव गायकवाड याचाही समावेश आहे. हत्तीपासून बागायतीचे झालेल्या नुकसानीची आकडेवारी कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत वनविभागाकडे नुकसानीची ७,९०६ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्याप्रमाणे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असून, ही रक्कम ९ कोटी ६९ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. सध्या हत्तींकडून नुकसानसत्र सुरूच असून यात वाढ होण्याची शक्यताही वनविभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, हत्तींच्या वावराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सध्या त्रस्त झाली आहे.हत्ती हल्ल्यात नुकसानीची प्रकरणे व अदा रक्कमवर्षप्रकरणेअदा रक्कम (रुपये)२००६-०७८४३१ कोटी ४३ लाख२००७-०८१५१०१ कोटी ५० लाख२००८-०९१४७७२ कोटी ६ हजार २००९-१०२८८७ लाख ६२ हजार२०१०-१११०२३१ कोटी २७ लाख२०११-१२५९९६४ लाख ४७ हजार२०१२-१३८७७१ कोटी १२ लाख ४३ हजार२०१३- १४८७७१ कोटी १२ लाख २०१४-१५५८१ ८३ लाख ३३ हजारहत्ती प्रश्न ठरतोय डोकेदुखीअपुरा कर्मचारी वर्ग, त्यात हत्ती बंदोबस्तासाठी दररोज कर्मचाऱ्यांची एक तुकडी जंगलात पाठवावी लागते त्यामुळे वनविभागापुढे अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपेक्षा मोहीम राबविली असती तर बरे झाले असते. पण ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय...’ अशीच काहीशी अवस्था वनविभागाची झाली आहे. हत्ती हल्ल्यातील मृत व्यक्तीनावतालुकादिनांकशंकर गावडेदोडामार्ग१० एप्रिल २००४ अशोक कुंभारकुडाळ ३० नोव्हेंबर २००६कृष्णा कदमकुडाळ१२ डिसेंबर २००७केशव उपरकरसावंतवाडी१८ आॅगस्ट २००८सीताराम परबकुडाळ१० एप्रिल २०१४मोहन सडवेलकरकुडाळ१८ एप्रिल २०१४ बाबू धुळू बुटेकुडाळ०७ जुलै २०१४हत्ती हल्ल्यातील जखमीचंद्रशेखर सावंत, रा. बांदा३१ जानेवारी २००६ सहदेव चांदेरकर, रा. आरोसबाग०२ मार्च २००६रवींद्र जळवी, रा. पिंगुळी३१ मार्च२००७पांडुरंग कुडतरकर, रा. भडगाव२९ एप्रिल २००७हेमंत धोंड, रा. वायगंणी ०३ एप्रिल २००७बाबाजी तारी, रा.ओटवणे १८ फेब्रुवारी २००८ विनायक कवठणकर, रा. शिरोडा२० सप्टेंबर २००९सुनिल कावळे, रा. आरवली२० सप्टेंबर २००९विलास येंडगे, रा. निळेली २० डिसेंबर २००९घन:श्याम बळीराम लाड, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११ बेनीत जॉकी डिसोजा, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११बाबूराव शिगार्डे, रा. निवजे २८ नोव्हेंबर २०१२विजया जाधव, रा. कसाल ०४ जून २०१४वैभव गायकवाड, रा. वेताळबांबर्डे १२ नोव्हेंबर २०१४