शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज

By admin | Updated: October 31, 2016 03:16 IST

उनपच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सदस्यांपदासाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहा. निवडणूक अधिकारी कविता गोडे यांनी दिली.

उरण : उनपच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सदस्यांपदासाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहा. निवडणूक अधिकारी कविता गोडे यांनी दिली. उरण नगर परिषदेच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. निवडणुकीत सत्ताधारी सेना, भाजपा विरोधात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकापचे एकत्रित येवून परिवर्तन महाआघाडी स्थापन केली आहे. महाआघाडीचे मार्गदर्शक माजी आ. विवेक पाटील यांच्या नेतृत्वखाली शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली होती. महाआघाडीतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, माजी अध्यक्ष महेंद्र ठाकूर, मनसे शहर अध्यक्ष जयंत गांगण तसेच महाआघाडीचे पदाधिकारी आणि समर्थक सहकारी झाले होते. यावेळी नगरध्यक्ष आणि सदस्यपदासाठी परिवर्तन महाआघाडीतर्फे इच्छुकांचे उमेदवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. शनिवारी शेवटच्या दिवसी सेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख बी. एन. डाकी, उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहर प्रमुख महेंद्र पाटील, दिपक भोईर, संतोष ठाकूर, रमेश म्हात्रे, उरण पं.स. सदस्य विजय भोईर आदि पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. सेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी अर्चना शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.भाजपच्या वतीनेही शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे ट्रस्टी महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे रॅलीही काढली होती. शेवटच्या दिवशी सदस्यपदाच्या १८ जागांसाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. (वार्ताहर)