शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या विशेष फेरीसाठी ६७,५०४ अर्ज; पुन्हा गोंधळ उडणार?

By admin | Updated: August 9, 2016 21:57 IST

अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन प्रवेश फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. दूरचे महाविद्यालय मिळालेल्या

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.09 - अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन प्रवेश फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही अखेरची संधी असून गुरूवारी, ११ आॅगस्ट रोजी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. तरी मोठ्या संख्येने महाविद्यालय बदलासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने गुणवत्ता यादीनंतर पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याआधी अकरावीच्या चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या होत्या. त्यात प्रवेश निश्चित केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी घरापासून दूर प्रवेश मिळाल्याने आणि मनपसंत महाविद्यालय मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली होती. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना चार गुणवत्ता यादीनंतर मेसेज पाठवून प्रवेशाची संधी देण्यात आली. तर अर्धवट अर्ज भरल्याने किंवा अन्य कारणास्तव आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठीही एक विशेष गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये आॅफलाईनच्या प्रवेशासाठी रखडलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या माध्यमातूनच प्रवेश घ्यावे लागले.  त्यानंतर आत्ता विशेष फेरी राबवण्यात येणार असून एकूण तीन गुणवत्ता यादी यामध्ये जाहीर होणार आहेत.अकरावी प्रवेशाच्या एकूण सहा फेºया पार पडल्यानंतरही विशेष फेरीसाठी ६७ हजार ५०४ प्रवेश अर्ज आले आहेत. त्यामुळे आधी राबवण्यात आलेल्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी असंतुष्ट असल्याचे दिसत आहे. विशेष फेरीसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली असून गुरूवारी पहिली विशेष यादी जाहीर होणार आहे. या यादीत मनपसंत महाविद्यालयाचे नाव जाहीर झाल्यास, संबंधित विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. मात्र यादीत जाहीर झालेले महाविद्यालय पसंत नसल्यास विद्यार्थ्यांनी आधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.