शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल

By admin | Updated: February 16, 2017 17:04 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखला झाल्या आहेत.

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखला झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर जिल्ह्यात २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५०  गणांसाठी  येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  यामुळे हवेली ३,  जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २, तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्या विरोधात विना परवानगी हळदी कुंकू, जेवणाचा तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड यांच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वेल्ह्यामध्ये विनापरवाना बॅनर्स आणि स्पिकर्स लावल्याने गणेश प्रकाश कोळपे व दिगंबर दिनकर चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुळशीमध्ये विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याने गंगाराम कुंडलीक मातेरे, शिवाजी राजाराम बुचडे, तृप्ती मदन साळुंखे आणि अविनाश शिंदे तसेच सागर सोपानराव मारणे, मिनाथ कानगुडेसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथे गाडीवर विनापरवाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा व पोस्टर्स लावल्याने राजेंद्र भाकरे, अमोल लोंड व महेश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)