शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ६६.१५ लाख रुपये जप्त

By admin | Updated: October 14, 2014 00:58 IST

निवडणूक भरारी पथकाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यात एस.टी. स्टँडवर ५३ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यात १३ लाख १५ हजार रुपये पकडले.

दिग्रस राष्ट्रवादी कार्यालय : प्रत्येकी दीड हजाराची ११० पाकिटे आढळलीनागपूर : निवडणूक भरारी पथकाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यात एस.टी. स्टँडवर ५३ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यात १३ लाख १५ हजार रुपये पकडले. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून येत असलेल्या एका इंडिका कारमध्ये सोमवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान पथकाने कुऱ्हाडी बसस्थानक येथे संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यामुळे भरारी पथकाने बसस्थानक येथे इंडिका कारची तपासणी केली असता गाडीत ५३ लाख रूपयांची रोकड मिळून आली. या गाडीसोबत संजय सुरजलाल नंदनवार (२२), विशाल गोविंद कुर्वे (३२), पंकज बांगरे (२६) आणि रवी पारधी (२१) हे चार तरूण होते. या तरूणांनी गोरेगाव येथील एटीएम मशीन टाकण्यासाठी सदर रक्कम आणल्याचे सांगितले. पथकाने पकडलेली रोकड गोरेगाव पोलीस ठाण्यात जमा केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस आणि पुसद येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान सोमवारी १३ लाख १५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुसद-दिग्रस मार्गावर घाटोडीनजीक भरारी पथकाला एका ओमनी कारवर (एम.एच.१४-डीएम-८२२३) संशय आला. म्हणून या पथकाने सदर कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. कार थांबवून तपासणी केली असता त्यात आठ लाख रुपये सापडले. ही रक्कम बँक आॅफ इंडियाच्या एटीएमची असल्याचे चालकाने सांगितले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती. देवानंद धबाले, भरारी पथक प्रमुख ठाकरे, मंडल अधिकारी जाधव, फौजदार विशाल बहात्तरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे दिग्रस येथे डॉ. मनीष पाटील (रा. पुसद) यांच्या वाहनातून साखरा गावानजीक साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या रकमेबाबत ते निवडणूक विभागाला समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. दिग्रसच्या तायडे लॉजमधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून पैशाचे वाटप होणार असल्याची गोपनीय माहिती येथील निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार सी.सी. कोरे, विस्तार अधिकारी विलास जाधव यांना सोमवारी सायंकाळी मिळाली. त्यावरून त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन प्रचार कार्यालयाची तपासणी केली. पथकाने रोखेसह हे साहित्य जप्त केले. पाकिटे फोडल्यानंतर त्यामध्ये एकूण १ लाख ६५ हजार रुपये निघाले. पथकाने प्रचार कार्यालय गाठताच तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. त्यामुळे केवळ हे साहित्य जप्त केले. त्यात प्रत्येकी एक हजार आणि दीड हजाराची रोकड असलेली ११० पाकिटे आढळून आली. (प्रतिनिधी)