शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

६४ विद्यार्थ्यांचा भार दोन शिक्षकांवर

By admin | Updated: August 26, 2016 16:57 IST

तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.26 -  तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बऱ्याचदा इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ६४ विद्यार्थ्यांना दोन शिक्षक शिकविताना दिसतात. या शाळेत त्वरित एका शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास पालकांनी आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.

दोन शिक्षकांवर अतिरीक्त ताणजि.प. शाळा क्रमांक तीन ही लांब अंतरावरील धनूर गावाजवळ म्हणजेच कापडणे गावाच्या हद्दीत येते. या शाळेत तीन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, येथे जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तेव्हापासून केवळ दोनच शिक्षक इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळताना अडचणी येताहेत.

शिक्षकांना करावी लागते तारेवरची कसरत येथील शाळेत दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक रजेवर गेला, तर उर्वरीत एका शिक्षकाला तारेवरची कसरत करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागते. बऱ्याचदा वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू असल्यास शांत बसा, असे सांगावे लागते. येथील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये एकूण चार वर्ग आहेत. पहिल्याच्या वर्गातील पटावर १८, दुसरीचे १४, तिसरी १६ व चौथीच्या वर्गात १६ असे एकूण ६४ विद्यार्थी पटावर आहेत.

तीन शिक्षकांची नियुक्ती गरजेची येथील जि.प. शाळेत तीन शिक्षकांची नियुक्ती असणे गरजेचे आहे. मात्र, दोन शिक्षक संपूर्ण शाळा व त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांभाळतात. त्यामुळे एक शिक्षक रजेवर गेला, तर अनेक अडचणी शिक्षकांना येतात. विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, तर शिक्षकांना अध्यापनाचे काम थांबवून विद्यार्थ्यांना शांत करावे लागते.

...तर शाळा बंद आंदोलन खाज्या नाईक नगरातील जि.प. शाळेत येत्या आठवड्यात शिक्षकाची नियुक्ती त्वरित करण्यात झाली नाही, तर गावातील आदिवासी बांधवांनी शाळा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची फरपट होते. शिक्षक नियुक्ती होत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

शिक्षण सभपतींच्या गावात शिक्षकांची कमतरताकापडणे गावाला जि.प.चे शिक्षण सभापतीपद नूतनताई पाटील यांच्या रूपाने मिळाले आहे. ते पद म्हणजे गावाचे मोठे भूषण आहे. सभापतीपद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी अपेक्षा पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे. मात्र, शिक्षकाची एक जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी भरून काढणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करावी, यासंदर्भात गावातील लोक प्रतिनिधीसोबतच ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुषंगाने येथील शिक्षण अधिकाऱ्यांशी वारंवार शिक्षकाची नियुक्ती करावी, मागणी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे माञ या कडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. माञ येथील शाळेत ताबडतोब शिक्षक नियूक्त करण्यासाठी माझा प्रयत्न चालू राहणार व या विदयार्थ्यांचे शैक्षणिक होणारे नूकसान लवकरच थांबवले जाईल.- नूतन शेखर पाटील, सभापती, शिक्षण व आरोग्य, जिल्हा परिषद शाळेत तीन शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. जूनपासून शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त आहे. त्या रिक्त जागेवर एका निलंबित असलेल्या शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे अशी केवळ चर्चा चालू आहे. मात्र, अजुनपर्यंत कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. - सुशिला पाटील, मुख्याध्यापिका, जि.प. शाळा क्रमांक