ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १९ : मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानात एका ६३ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक 'लँडिंग' करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, मृदुलता सहाय असे महिलेचे नाव आहे. ती वाराणसीला जात होती. तिला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर विमान सायंकाळी ६.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. लगेचच तिला वर्धा रोडवरील आरोग्यम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. महिला कर्करोगाने पीडित असल्याची माहिती आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. विमान सायंकाळी ७.३० वाजता वाराणसीकडे रवाना झाले. सोनेगांव पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत.
६३ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने इंडिगो विमानाचे आकस्मिक 'लँडिंग'
By admin | Updated: July 19, 2016 22:37 IST