शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तत्पर अधिकाऱ्यामुळे ६३ कोटी रुपयांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 09:51 IST

राज्य शासनाला लाभ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा हप्ताही होणार कमी

- योगेश बिडवई मुंबई : महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविणाºया नॅशनल इन्शूरन्स कंपनीला गेल्या सहा वर्षांत प्रीमिअमपोटी दिली गेलेली व खर्च न झालेली ६३.७८ कोटी रूपयांची ‘प्रसिद्धीची रक्कम’ राज्य सरकारने परत मिळविली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे या योजनेचा प्रीमिअम २ टक्के कमी करून घेतल्याने योजनेचा खर्चही तेवढा कमी होणार आहे.गेली सहा वर्षे राज्य सरकार ही योजना उपरोक्त विमा कंपनीच्या माध्यमातून राबवित आहे. या संबंधीचा जो मूळ करार झाला त्यात असे ठरले होते, की कंपनीने सरकारकडून प्रीमिअमपैकी २ टक्के रक्कम योजनेच्या जाहिरात व प्रसिद्धीवर खर्च करावी. मात्र यंदाच्या जूनअखेरपर्यंत कंपनीकडे अशा प्रकारे खर्च केलेली ६३.७८ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित उद्देशासाठी खर्च न करता पडून आहे, असे जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आले. कंपनीने हे पैसे परत करावेत असा शिंदे यांचा आग्रह होता. मात्र ही रक्कम संबंधित वित्तीय वर्ष संपल्यानंतर ‘व्यपगत’ झाली, ती परत करता येणार नाही, असे कंपनीचे म्हणणे होते.अखेर शिंदे व कंपनीचे मुंबई विभागीय व्यवस्थापक आणि योजना प्रमुख ए. राजगोपालन यांच्यात ८ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या अखर्चित रकमेबाबत सहमतीने निर्णय झाला. त्यानुसार कंपनी ही रक्कम १५ डिसेंबरअखेर चार मासिक हप्त्यात सरकारला परत करणार आहे. बैठकीत असेही ठरले की, यापुढे जाहिरात व प्रसिद्धीसाठी अशी रक्कम प्रीमिअममध्ये अंतर्भूत करण्यात येणार नाही. त्यामुळे योजनेचा प्रीमिअमच दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. अशा प्रकारे सरकारचा दुहेरी लाभ झाला आहे. एक म्हणजे कंपनीस दिली गेलेली अनावश्यक रक्कम परत मिळणार आहे व दुसरे असे की, यापुढे प्रीमिअमही कमी भरावा लागेल.