पुणे : सनबर्न फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगरावर सपाटीकरण करण्यात आले असून, रस्त्यासाठीदेखील उत्खनन करण्यात आले आहे. यासाठी तहसीलदार अथवा जिल्हा खनिकर्म विभागाची कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे सनबर्नला तब्बल ६२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंडाची रक्कमदेखील त्वरित भरण्याचे आदेश हवेली प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत.फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील डोंगरावर कार्यक्रमासाठी व रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन सपाटीकरण करण्यात आले आहे. तसेच अनेक झाडांची कत्तलदेखील करण्यात आली. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अमली पदार्थाचा प्रचंड वापर, परदेशी डीजे, बॅन्ड, परदेशी कलाकार, विविध विभागाच्या परवानग्या यामुळे वादात सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सनबर्नच्या आयोजकांनी केसनंद येथील गट नंबर ५९ व ६० मध्ये बेकायदेशीरपणे सुमारे २ हजार ४६१ ब्रासचे उत्खनन केले. यासाठी तहसीलदार अथवा जिल्हा खनिकर्म विभागाची कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे सनबर्नला तब्बल पाचपट म्हणजे ६२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.करमणूक करापोटी भरले १ कोटी ७७ लाख रुपयेपुण्यात २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान चार दिवस सनबर्न फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी डीजे, बॅन्ड आयोजिण्यात आले आहेत. फेस्टिव्हलसाठी चार दिवसांत लाखो लोक भेट देतील, असा अंदाज आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने कायद्यानुसार सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना कमरणूक कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोजनकांनी एक कोटी रुपयाचे डिमान्ड ड्राफ्ट व ७७ लाख रुपये जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केले असल्याची माहिती करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी दिली.
सनबर्नला ६२ लाखांचा दंड
By admin | Updated: December 31, 2016 05:40 IST