शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६२ आयएएसची कमतरता

By admin | Updated: July 5, 2016 04:31 IST

राज्यात पहिल्यांदाच राज्य सेवेतील तब्बल ५७ अधिकाऱ्यांना आयएएस होण्याची संधी मिळाल्याने आयएएसमध्ये महाराष्ट्राचा टक्का एकदम वाढला आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत

- अतुल कुलकर्णी, मुंबई

राज्यात पहिल्यांदाच राज्य सेवेतील तब्बल ५७ अधिकाऱ्यांना आयएएस होण्याची संधी मिळाल्याने आयएएसमध्ये महाराष्ट्राचा टक्का एकदम वाढला आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या सचिव दर्जाच्या पदांवर राज्य सेवेतील अधिकारी काम करताना दिसून येतील. असे असले तरी अजूनही राज्यात ६२ आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता आहेच. २०१३ मध्ये राज्य प्रशासकीय सेवेतून पदोन्नती होणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या फाइलमध्ये गडबड झाली आणि तेव्हापासून पुढे तीन वर्षे राज्यसेवेतून आयएएस होणाऱ्यांचे प्रमाण एकदमच कमी झाले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात याला थोडी चालना मिळाली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामात लक्ष घातले आणि २०१३ ते २०१६ या चार वर्षांतले राज्य प्रशासकीय सेवेतून आयएएस करण्यासाठीच्या सगळ्या फायलींना वेगवान गती मिळाली. परिणामी चार वर्षांत मिळून ५७ अधिकारी आयएएस झाले. हे सगळे या वर्षात घडल्याने मोठ्या प्रमाणावर राज्याच्या प्रशासकीय क्षेत्राला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदा मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. तेथे काम केल्यास सगळ्या राज्याचा आवाका अधिकाऱ्यांना येऊ शकतो. यामुळे नव्याने आयएएस झालेल्यांची पहिली पोस्टिंग शक्यतो जिल्हा परिषदेत दिली जावी असे संकेत आहेत. मात्र काही अधिकाऱ्यांनी आपापले ‘वजन’ वापरून जिल्हा परिषदांच्या ऐवजी पुण्या-मुंबईत पोस्टिंग मिळवून घेतल्या आहेत. चांगल्या कामाचे माध्यमांमधून कौतुक - आयएएस म्हणून मिळणाऱ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये उत्तम काम करता यावे आणि तेथील कामाचा प्रभाव पडावा, यासाठी अनेक जण मन लावून काम करतात अशी अनेक उदाहरणे आहेत. या ५७ अधिकाऱ्यांमधील अनेक जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सुरू केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक माध्यमांमधून होऊ लागले आहे. नव्या दमाचे हे अधिकारी दमदार काम करू लागले तर राज्याचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना ज्येष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली.361 - आएएस संवर्गाच्या जागा 299 - सध्या कार्यरत अधिकारी62 - एकूण रिक्त जागा 252 - राज्याचा थेट सेवेचा कोटा 215 - थेट सेवेत कार्यरत अधिकारी 37 - थेट सेवेतील रिक्त जागा