शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

६ हजारावर घरात आढळले डेंग्यूचे डास

By admin | Updated: October 13, 2014 01:18 IST

शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १३६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे, असे असताना नागरिक आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

हिवताप व हत्तीरोग विभाग : अडीच लाखाच्यावर घरांची केली तपासणी नागपूर : शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १३६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे, असे असताना नागरिक आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला मागील २६ दिवसांत ६ हजार ७९९ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. यात विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठे पाणी साचले आहे का, याची तपासणी करून लोकांना मार्गदर्शन करीत आहे. एकीकडे डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना नागरिक मात्र याला गंभीरतेने घेत नसल्याचे विभागाच्या चमूला आढळून आले आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर पर्यंत २ लाख ५५ हजार ९७१ घरांची तपासणी केली असता ६ हजार ७९९ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वसाहतींमध्ये जिथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले त्या भागांच्या ४ हजार ७६१ घरांना भेटी दिल्या असता यातील २४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या तर तापाचे १० रुग्ण या चमूला आढळून आले. भेंडे ले-आऊट, खामला, सीताबाई नगर, मानव नगर, सुर्वे नगर, धोटे नगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर आदी ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. हिवताप व हत्तीरोग विभागाचे अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू आहे. (प्रतिनिधी)