शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६० हजार, मुंबईत २५ हजार बोगस डॉक्टर

By admin | Updated: July 7, 2015 04:10 IST

तापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूजा दामले, मुंबईतापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात तब्बल ६० हजार आणि मुंबईत २५ हजार डॉक्टर बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांनीच लोकमतला ही माहिती दिली. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनीही या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणांहून आम्हाला वेळोवेळी इनपुट्स मिळत असतात. त्याआधारे राज्यातील बोगस डॉक्टरांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. यातील बहुतेक डॉक्टर पश्चिम बंगालमधून दाखल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपाउंडर म्हणून अनेक व्यक्ती दवाखान्यात अनेक वर्षे काम करत असतात. वर्षानुवर्षे तेच काम केल्याने डॉक्टर कोणत्या आजाराच्या वेळी कोणत्या गोळ्या देतात, याचा अंदाज त्यांना येतो. एवढ्या माहितीच्या आधारावर हे कंपाउंडर थेट डॉक्टरांच्या थाटात व्यवसाय सुरू करतात, अशी माहितीही वैद्यकीय परिषदेच्या सूत्रांनी दिली. ग्रामीण भागात चालणारे बहुतेक दवाखाने हे अशाच व्यक्तींद्वारे चालवले जातात. लवकर बरे वाटावे तसेच कमी पैशांत औषधे उपलब्ध होत असल्याने या तथाकथित डॉक्टरांकडे मोठी गर्दी होते. प्रत्यक्षात या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा मान्यताप्राप्त वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसतो. तसेच त्यांची कोणत्याही वैद्यकीय परिषदेत नोंदणीदेखील नसते. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही गल्ल्यागल्ल्यांमध्ये असे दवाखाने आता सुरू आहेत. बोगस डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसताना ते सरधोपटपणे औषधे देतात. यामुळे राज्यातील जनतेचा जीव धोक्यात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत !> महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. च्ग्रामीण भागातील दवाखान्याच्या बोर्डवरूनदेखील या परिस्थितीचा अंदाज येतो. राज्यात जितके नोंदणीकृत डॉक्टर आहेत, तितकेच बोगस डॉक्टर असू शकतात.> ‘सरकारने गांभीर्याने पाहावे’एकट्या दिल्लीत ४० हजार बोगस डॉक्टर होते. ते प्रमाण पाहता मुंबईसह राज्यातील बोगस डॉक्टरचे प्रमाण हे किती तरी अधिक असण्याचीच शक्यता आहे. सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शोधप्रक्रिया राबवण्याची गरज आहे.  - डॉ. शिवकुमार उत्तुरे, सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद> जिवाला धोकातज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, कोणतेही औषध देताना रुग्णाचा आजार, त्याचे कारण, वय अशा अनेक गोष्टींचा विचार करून डोस दिला जातो. फक्त आजार पाहून औषध दिल्यास रुग्णाच्या जिवाला धोका असतो.