शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६ हजार रिक्षांची तपासणी

By admin | Updated: June 12, 2017 03:04 IST

धावत्या रिक्षामध्ये कापुरबावडी उड्डाणपुलावर २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर पीडित तरुणीच्या माहितीनुसार, पोलिसांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘३’

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : धावत्या रिक्षामध्ये कापुरबावडी उड्डाणपुलावर २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर पीडित तरुणीच्या माहितीनुसार, पोलिसांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘३’ अंकापासून सुरू होणाऱ्या रिक्षांच्या नंबरची यादी मागितली होती. ती आता ठाणे शहर पोलिसांना मिळाली असून, या यादीत तब्बल ६ हजार रिक्षांचे नंबर मिळाले आहेत. त्यामुळे आता पोलिसांसमोर त्यातील नेमकी रिक्षा, तसेच रिक्षाचालक व मालक कोण यांना शोधण्याचे आव्हान आहे.गेल्या चार दिवसांपासून ठाणे शहर परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी हे नौपाडा पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत तपास सुरू आहे. रिक्षाचा नंबर हा ‘३’ क्रमांकाने सुरू होतो, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यानुसार ठाणे पोलिसांनी आरटीओकडे ३ अंकापासून सुरू होणाऱ्या रिक्षांची यादी मागवली. आरटीओने तयार केलेल्या यादीत ६ हजार रिक्षांचे नंबर असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्या यादीद्वारे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, काही रिक्षाचालकांना पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. तर काही रिक्षाचालकांच्या घरी पोलीस जाऊन माहिती घेण्याचे काम ठाणे पोलिसांनी सुरू केले आहे.१० ते १२ पथके कार्यरतया घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ-१मधील स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत प्रत्येकी एक विशेष पथक तयार केले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेचीही मदत घेतली आहे. त्यानुसार १० ते १२ पथक शोधकार्य करत आहेत. तरीही पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही.