शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किमी धावणार!

By admin | Updated: June 30, 2016 04:16 IST

क्रीडापटू पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील गुरुवारी वयाच्या ५८ व्या वर्षी ३९ वर्षांच्या पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत.

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्हा पोलीस दलातील क्रीडापटू पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील गुरुवारी वयाच्या ५८ व्या वर्षी ३९ वर्षांच्या पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. ३० जूनला अलिबाग पोलीस मुख्यालय-कार्लेखिंड-पोयनाड-वडखळ-साई मंदिर(पेण) आणि परत अलिबाग पोलीस मुख्यालय असे ५८ किमी अंतर धावून महाराष्ट्र पोलीस दलासमोर क्षमता सिद्धतेचा आगळा वस्तुपाठ ठेवणार आहेत. रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनीही पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून ते धावण्यास प्रारंभ करणार असल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.१९७७ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल (खेळाडू) म्हणून पाटील दाखल झाले. उत्तम कबड्डीपटू असलेल्या पाटील यांनी चमकदार कामगिरी करत याच रायगड पोलीस दलात ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदापर्यंत मजल मारली. सध्या ते दादर सागरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १९९३ ते २००६ या कालावधीत रायगड जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख म्हणून कार्यरत असताना रायगड पोलीसच्या कबड्डी संघास त्यांनी विशेष प्रशिक्षण दिले आणि या संघाने जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धा जिंकून आगळा विक्रम प्रस्थापित केला होते. रायगड पोलीस दलाबरोबरच महसूल विभागातील खेळाडूंना देखील त्यांनी मैदानी खेळ तसेस कबड्डीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी कारकिर्दीत १०० हून अधिक कबड्डीपटू घडवून आगळा विक्रम देखील केला आहे. पाटील यांच्या सातत्यपूर्ण विशेष कर्तृत्वाची दखल घेवून सन २०१४ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक तर २०१५ मध्ये अत्यंत मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. ६२०० बैठका, ३२५३ सूर्यनमस्कारांचा विक्रमकेवळ दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्यापेक्षा स्वकृतीतून खेळाडू घडवण्याकडे त्यांचा कल असून, त्यातून त्यांनी २००६ मध्ये सलग ३ हजार २५३ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला. तर २००८ मध्ये सलग तब्बल ६ हजार २०० जोर (बैठका) मारून विक्रम प्रस्थापित केला. निवृत्ती दिनी पोलीस दलातील तरुण सहकाऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवण्याकरिता आपण ५८ किमी धावणार असल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.