शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

५८ किलो सोने लुटले

By admin | Updated: April 25, 2015 04:30 IST

मुंबईतून सोन्याची बिस्किटे घेऊन शिरपूरकडे निघालेले वाहन वाडीवऱ्हे गावापासून काही अंतरावर अडविले जाते. पोलिसांच्या वेषातील दरोडेखोर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चालक आणि सुपरवायझरचे हातपाय बांधतात

नाशिक : मुंबईतून सोन्याची बिस्किटे घेऊन शिरपूरकडे निघालेले वाहन वाडीवऱ्हे गावापासून काही अंतरावर अडविले जाते. पोलिसांच्या वेषातील दरोडेखोर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चालक आणि सुपरवायझरचे हातपाय बांधतात आणि वाहनातील ५८ किलो सोन्याची बिस्किटे आपल्या बॅगेत भरून पोबारा करतात. एखाद्या चित्रपटात शोभून दिसावा असा थरारक प्रकार नाशिक महामार्गावर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला़शिरपूर येथील एका व्यापाऱ्याने अंधेरी (मुंबई) येथील दोन दुकानांतून ६० किलो सोन्याची खरेदी केली होती. ते सोने शिरपूर येथील गोल्ड रिफायनरीमध्ये सुरक्षितरीत्या पोचविण्याची जबाबदारी अंधेरी येथील सिक्वेल सिक्युअर या खासगी सुरक्षा कंपनीवर सोपविली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास या सुरक्षा कंपनीचा चालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे आणि संतोष साहू, सुपरवायझर समीर मनवर पिंजारा हे झायलो (एम.एच.०२,सी.ई.४०१०) गाडीने शिरपूरकडे निघाले. कसारा बायपासजवळ एका हॉटेलमध्ये चहापान करून ते ११.४५ वाजता नाशिकच्या दिशेने रवाना झाले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हे वाहन वाडीवऱ्हे गाव ओलांडून शेवाळी विहीर परिसरातून जात असताना अंबर दिवा लावलेल्या एका वाहनाने पाठलाग सुरू केला. पोलिसांचे वाहन असेल असे समजून सुरक्षा कंपनीच्या वाहनचालकाने रस्ता मोकळा करून दिला. नेमकी तीच संधी साधली गेली आणि सोने लुटले गेले.