शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

५६२ अघोषित शाळा अनुदानासाठी पात्र घोषित

By admin | Updated: July 2, 2016 02:46 IST

खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ५६२ शाळा व ३२२ वर्ग तुकड्या शुक्रवारी अनुदानासाठी पात्र घोषित झाल्या आहेत.

मुंबई : राज्यातील कायम विना अनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ५६२ शाळा व ३२२ वर्ग तुकड्या शुक्रवारी अनुदानासाठी पात्र घोषित झाल्या आहेत. त्यामुळे या शाळांवर आणि तुकड्यांवर अध्यापन करणाऱ्या ५ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.याआधी कायम विना अनुदानित शिक्षकांच्या कृती समितीने अघोषित शाळा अनुदानासाठी पात्र घोषित करण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. त्याला सर्वच शिक्षक आमदार आणि संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. त्या वेळी मूल्यांकनाचे निकष पूर्ण करणाऱ्या व अनुदानास पात्र अघोषित शाळा लवकरच घोषित करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते. त्यानंतर निघालेल्या शासन आदेशामुळे गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून वेतनाशिवाय अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासन आदेशानुसार प्राथमिक विभागातील १५८ शाळांमधील ८२३ शिक्षक पदे, १३४ वर्ग तुकड्यांवरील ५९४ शिक्षक पदे असे प्राथमिक विभागासाठी १ हजार ४१७ शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर माध्यमिक विभागात ४०४ शाळांमधील २ हजार ०२२ शिक्षक, १८८ वर्ग तुकड्यांवरील ८१० शिक्षक पदे, तर १ हजार ४२६ शिक्षकेत्तरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. अशा प्राथमिक व माध्यमिक शाळांवरील सुमारे ४ हजार २४९ शिक्षक व १ हजार ४२६ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली.अनुदानाबाबत शासन निर्णयात स्पष्टता हवीमंत्री विनोद तावडे यांनी ८३१ शाळांपैकी केवळ ५६२ अघोषित शाळांची नावे घोषित केलेली आहेत. त्यामुळे इतर शाळांची नावे यादीत नसल्याने लढा अद्याप संपलेला नाही. शिवाय शाळांना मिळणाऱ्या अनुदानाचा टप्पा शासनाने स्पष्ट केलेला नाही. याबाबत शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली. कारण सर्व अघोषित शाळांना संपूर्ण अनुदान मिळाल्यानंतरच खरा न्याय मिळेल, आणि हीच दिवंगत शिक्षक गजानन खरात यांना श्रध्दांजली ठरेल, असे रेडीज यांनी सांगितले.