शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला विजेसाठी ५६० कोटी

By admin | Updated: March 5, 2016 04:06 IST

बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले

लातूर : बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले. कोकणातून चारा आणून विभागीय आयुक्तांमार्फत चारा डेपो सुरु करणार असून उजनी-उस्मानाबादची योजना १६ एमएलडी करण्याच्या १३.४४ कोटीच्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. लातूरला टंचाईसाठी १५ कोटीसह तब्बल सात वेळा मंजूर होऊन न झालेल्या भंडारवाडीच्या ३७ कोटीच्या प्रस्तावाला पुन्हा मंजुरी इतकेच काय ते लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे फलित. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा छावण्यांसाठी आणखी ५० कोटी वाढविल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे दर जुन्या डीएसआरने १८१ रुपयेअसून ते देखील वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर आणि डुबकी घेण्यासाठी घालून दिलेल्या आर्थिक निकषांच्या मर्यादा दुप्पट केल्या आहेत. गावातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील आणि केशरीमधून हुकलेल्या शेतमजुरांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गव्हू योजनेत विनाशर्त सामावून घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात १७९९ टँकर सुरु असून त्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्याच्या पेरणी हंगामासाठी कृषी विभाग जे बियाणं पुरवितं त्यात दुप्पट वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शैक्षणिक फी माफीचा विस्तार आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांकडे दिला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. > मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी काही द्यायला आलो नाही तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, हे पहायला आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा अक्षरश: भ्रमनिरास केला. सरकारने केलेल्या कर्तबगारीचे दाखले देत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. आत्महत्या करू नका,’ असे आवाहन करून कोरडा दिलासा दिला.