शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

५५० कोटींचे वीज शुल्क उद्योगांच्या घशात : काँग्रेस

By admin | Updated: February 9, 2016 01:16 IST

राज्य सरकारने सुमारे ५५० कोटी रुपयांचे वीज शुल्क बेकायदेशीरपणे १३०८ उद्योगांच्या घशात घालून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी

मुंबई : राज्य सरकारने सुमारे ५५० कोटी रुपयांचे वीज शुल्क बेकायदेशीरपणे १३०८ उद्योगांच्या घशात घालून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. दुष्काळाच्या नावाखाली सर्वसामान्यांवर कर लादण्याची तत्परता दाखविणारे सरकार धनदांडग्यांच्या उद्योगांकडील कोट्यवधी रुपयांच्या आकारणीबाबत मात्र उदासीन का, अशी विचारणाही त्यांनी केली.ते म्हणाले, वितरणमुक्त प्रवेश अर्थात ओपन अ‍ॅक्सेसद्वारे वीज वापरास महाराष्ट्रातील उद्योगांना परवानगी आहे. या पद्धतीनुसार आॅक्टोबर २०१४पासून आजमितीस महाराष्ट्रातील १३०८ उद्योगांना सुमारे ६६२३ दशलक्ष युनिट्सचा वीजपुरवठा झाला. मुंबई विद्युत शुल्क अधिनियम १९५८मधील कलम ३मध्ये वीजवापरावर शुल्क आकारणीची तरतूद आहे. उद्योगांनी वापरलेली वीज कोणत्याही मार्गाने किंवा कोणत्याही राज्यातून उपलब्ध झालेली असली तरी त्यावर ही आकारणी देय आहे. त्यानुसार ६६२३ दशलक्ष युनिट्सवर वीज वितरण मंडळाच्या ८ रुपये दराने प्रति युनिट आकारणी व ९.३ टक्के दराने वीज शुल्क वसूल करायला हवे होते. ही रक्कम सुमारे ४९३ कोटी रुपयांच्या घरात आहे. या रकमेवर वीज विक्रीकर म्हणून सुमारे ६० कोटी रुपये वसूल करायला हवे होते. ही एकूण रक्कम ५५० कोटी रुपये असून, एवढा प्रचंड महसूल शासनाने उद्योजकांच्या घशात घातला आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. (प्रतिनिधी)