शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बुलेट ट्रेनसाठी ५३,४६७ खारफुटींच्या कत्तलीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:06 IST

एनएचएसआरसीची उच्च न्यायालयाला माहिती : केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाकडून हिरवा कंदील

मुंबई : बुलेट ट्रेनसाठी ठाणे, नवी मुंबई व पालघर या पट्ट्यात १३.३६ हेक्टर जागेवर पसरलेल्या ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिली, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन (एनएचएसआरसी)ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

एमओईएफने दिलेल्या परवानगीमुळे आता हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या असल्याचा दावा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने केला आहे.

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटी (एमसीझेडएमए)ने ७ मार्च रोजी एनएचएसआरसीएलचा खारफुटी तोडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. एमसीझेडएमएने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रानुसार, मुंबई ते ठाणेदरम्यान ३२.४३ हेक्टर जागेवर पसरलेले कांदळवन या ठिकाणाहून हटवावे लागेल.

एमसीझेडएमएने बुलेट ट्रेनसाठी कांदळवन नष्ट करण्यास नकार दिल्याने एनएचएसआरसीएलने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेच्या सुनावणीत वरील माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर या पट्ट्यातील खारफुटी हटविण्यासाठी एनएचएसआरसीएलने एमसीझेडएमला अर्ज केला. मात्र, २२ डिसेंबर २०१८ रोजी प्राधिकरणाने एनएचएसआरसीएलचा अर्ज फेटाळला.

कांदळवने नष्ट होण्याची भीती!एनएचएसआरसीएलच्या याचिकेनुसार, मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा १५५.६४२ कि. मी. लांबीचा कॉरिडोअर महाराष्ट्रातून जाणार आहे. १३१.४३ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या वनक्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी ३२.४३ कि. मी. भाग हा सीआरझेडमध्ये येत आहे. तर ८.३९ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. तसेच १३.३६ हेक्टरवर पसरलेल्या कांदळवनावर याचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन