आॅनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ – मालाड मालवणी येथे अवैधरित्या विकण्यात येणा-या नकली दारूने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मालवणी येथील झोपडपट्टीमध्ये आक्का या नावाने परिचित असलेली महिला अवैध दारू विक्रिचा धंदा करायची, या प्रकरणानंतर अक्का फरार असून तिच्याकडे कामकरणारा राजू लंगडा याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अक्का स्वतः दारू बनवत नसून ठाणे जिल्ह्यातून चोरट्यामार्गाने दारू आणून ती विकत असल्याचे पोलीस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच या अक्कावर राज्य उत्पादन शुल्काने गेल्या डिसेंबरमध्ये छापा घालून कारवाई केली होती.