शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ५२५ गावांना दुष्काळाची झळ

By admin | Updated: November 20, 2014 01:12 IST

दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली

आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी : विभागातील २०२९ गावांचा समावेशनागपूर : दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली असून तेथील शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.सलग गत दोन वर्षापासून निसर्गाच्या दुष्टचक्रात राज्यातील शेतकरी सापडला असून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या मदतीनंतरही तो सावरण्याची शक्यता नाही. यंदा पावसाळा विलंबाने सुरू झाल्याने त्याचा फटका कृषी हंगामाला बसला. त्याची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली असली तरी त्यातून विदर्भ विशेषत: नागपूर विभाग सुटलेला नाही. या विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी)५० टक्केपेक्षा कमी असून शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ आणि भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा समावेश आहे. सर्वाधिक झळ ही विभागातील वर्धा जिल्ह्याला बसली असून त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.नागपूर जिल्ह्याची स्थितीनागपूर जिल्ह्यात एकूण १९५३ गावे आहेत. यापैकी खरीप पिकांची लागवड झालेल्या गावांची संख्या १८४४ आहे. यापैकी १७९५ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी) जाहीर करण्यात आली असून ५२५ गावांची आणेवारी ही ५० टक्केपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ या गावात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. उर्वरित १२७० गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे. बुडित क्षेत्रातील, प्रकल्पात गेलेली किंवा अकृषक असलेल्या एकूण १४४ गावांची आणेवारी जाहीर करण्यात आली नाही.मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळाचे संकट असल्याचे जाहीर केले होते व त्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांच्या गृह जिल्ह्यातील ५०० वर गावे दुष्काळाशी झुंज देत असल्याने ही मदत लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त भागांना आर्थिक मदत करण्यात अडचणीची ठरणारी व्यक्तिगत पंचनाम्याची पारंपरिक पद्धत मुख्यमंत्र्यांनी दूर केली आहे. पंचनाम्यासाठी गावपातळीवरचा निकष यापुढे लागू करण्यात येणार आहे. (ज्या गावातील आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे अशी) त्याचा फायदा शेतकऱ्यांना यावेळी होऊ शकतो.(प्रतिनिधी)