मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. त्यानुसार, मुंबई परिसरात ५,०५२ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. मुंबई परिसरात गिरणी कामगारांना सहा बंद गिरण्यांच्या जागांवर २ हजार ६३४ तर एमएमआरडीएकडून २ हजार ४१८ घरे दिली जातील, असे ते म्हणाले. गिरणी कामगारांच्या संघटनांबरोबर आज बैठक होऊन त्यामध्ये बंद गिरण्यांच्या जागांवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर, जयश्री खाडीलकर, नंदू पारकर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
गिरणी कामगारांना ५,०५२ घरे देणार!
By admin | Updated: April 13, 2016 03:21 IST