शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

500 रुपयांची नोट घेण्यास नकार; ग्राहकाने रस्त्यावर फेकली बिर्याणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 22:07 IST

उमरी येथे एका हॉटेल मालकाने 500 रुपयांची नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व हॉटेल मालक यांच्यात मारामारी झाली़, यावेळी एका ग्राहकाने थेट हॉटेलमधील बिर्याणीचे

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 09 - उमरी येथे एका हॉटेल मालकाने 500 रुपयांची नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व हॉटेल मालक यांच्यात मारामारी झाली़, यावेळी एका ग्राहकाने थेट हॉटेलमधील बिर्याणीचे पातेलेच रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास काही ग्राहक एका हॉटेलात आले होते. खाद्यपदार्थ घेतल्यानंतर संबंधितांनी 500 रुपयाची नोट दिली. त्यावेळी हॉटेल चालकाने चिल्लर नाहीत, असे सांगून नोट घेण्यास नकार दिला. यामुळे ग्राहक आणि हॉटेल मालक यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. हॉटेलमधील कामगार व इतरांना मारहाण करण्यात आली़. ग्राहकाने बिर्याणीचे पातेले रस्त्यावर फेकले. परिणामी वातावरण चिघळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फारूख खान तत्काळ घटनास्थळी आले.  पोलिसांना पाहताच ग्राहक पळून गेले. हॉटेल मालक व नोकरांची समजूत घालून सहाय्यक पोलिस निरीक्षक खान यांनी वातावरण शांत केले. तरीही दोन्ही बाजूने जमाव एकत्र येवू लागला. यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवार यांच्यासह पोलिस फौजफाटा पोहोचला. काही वेळेत अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, उपअधीक्षक विशाल खांबे, भोकरचे पोलिस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक शहदेव खेडकर, ज्ञानेश्वर शिंदे आदींनी जमावाला पांगविले. उमरीसह भोकर, कुंडलवाडी, धर्माबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाखल झाले. नांदेडहून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी वातावरण निवळले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.