शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमजीएलच्या समभागातून ५२० कोटींचा फायदा

By admin | Updated: July 2, 2016 04:35 IST

समभागांमुळे राज्य सरकारला तब्बल ५२० कोटींचा नफा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई : मुंबईत गॅसपुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)च्या मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील समभागांमुळे राज्य सरकारला तब्बल ५२० कोटींचा नफा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबईत गॅसपुरवठा करणाऱ्या एमजीएलच्या समभागांच्या खरेदीसाठी डिसेंबर २०१४मध्ये राज्य सरकारने १० कोटी रुपये मोजले होते. एमजीएलमध्ये राज्य सरकारचा १० टक्के इतका वाटा असून, गेल, बीजीएल, राज्य सरकार आणि खासगी समभागधारकांकडे उर्वरित वाटा आहे. २०१४ साली राज्य सरकारने १० रुपये प्रति समभाग या दराने १० कोटींचे समभाग विकत घेतले. आज या समभागांची किंमत ५३० रुपये प्रति समभाग इतकी झाली आहे. म्हणजेच १० कोटींची किंमत आज ५३० कोटी रुपये इतकी झाली आहे. कंपनीमार्फत ४ लाख २० हजार वाहनांना सीएनजी पुरविण्यात येतो. त्यातील १ लाख ९६ हजार रिक्षा आहेत. नागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासोबतच प्रदूषणही कमी होण्यास मदत होते आहे. नवी मुंबईतही सीएनजीचे तीन नवीन पंप सुरू करण्यात येणार असून, रायगडमध्येही कंपनीचा लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याचेही अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.दक्षिण मुंबई, धारावी आणि मुंबईतील काही भागांत अरुंद रस्त्यांमुळे पाइपलाइन टाकणे शक्य नसल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)