शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही पुनर्वसनसाठी ५०० कोटी

By admin | Updated: August 13, 2015 01:56 IST

मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. मुंबई शहरातील झोपडपट्टी समुहाची (क्लस्टर) व योजनांच्या बाहेरील हद्दीची मोजणी ईटीएस/जीपीएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. ही प्रक्रि या जलद करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे विकास नियोजन आराखड्याच्या व नगरभूमापनाच्या हद्दीसह अद्ययावत जीआयएस मॅप तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)झोपू योजनेत सुलभता..झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रि या आता सुलभ व जलद करण्यात येणार आहे. तसेच पात्र असलेल्या व बैठकीस उपस्थित झोपडीधारकांपैकी ७० टक्के; परंतु एकूण पात्र झोपडीधारकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी नाही या तत्त्वावर गुप्त मतदानाद्वारे विकासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यापूर्वी विकासकाची नेमणूक ही विकास नियंत्रण नियमावलीनुसार ७० टक्के झोपडीधारकांच्या संमतीने होत होती. मात्र, या संमती मिळण्याच्या प्रक्रि येस विलंब होऊन प्रकल्प रखडत होता. आता या प्रक्रि येत सुधारणा केल्यामुळे पुनर्वसन प्रकल्प जलद पूर्ण होण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. खासगी मालकांना संधी..झोपडपट्टी असलेल्या खासगी जमिनीच्या मालकांना प्राधान्याने तीन महिन्यांच्या कालावधीत पुनर्वसन योजना दाखल करण्याची संधी देण्यात येणार आहे. वेळेत योजना दाखल न केल्यास या जमिनीचे नियमानुसार संपादन करण्यात येईल. तसेच शासकीय व निमशासकीय जमिनींवरील झोपडीधारकांना पुनर्वसन योजना सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाणार असून ती त्यांनी मुदतीत सादर न केल्यास प्राधिकरणामार्फत निविदेद्वारे विकासकाची नेमणूक करु न ही योजना राबविली जाईल....तर वास्तव्य करणाऱ्यास सदनिका...सर्व झोपडधारकांची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने आपल्या पातळीवर जीआयएस सक्षम बायोमेट्रिक सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जुलै २०१५ पूर्वी झालेल्या सदनिकांचे अनधिकृत हस्तांतरण झाले असल्यास प्रत्यक्ष वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना सदनिकांचे पुनर्वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. त्यानुसार पूर्वीचा मालक शासनाच्या योजनेतील नवीन घरासाठी अपात्र ठरविणार आहे.