शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटी

By admin | Updated: July 2, 2016 03:21 IST

विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली

महाड : किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि तमाम शिवभक्तांच्या मनातील रायगड घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेला हा अमूल्य ठेवा अखंडपणे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील देशमुख यांनी यावेळी दिली.कृषी दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ११ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम आज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी महाडचे आ. भरत गोगावले, मा. आ. माणिक जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पं. स. सभापती दीप्ती फळसकर, कृषी अधिकारी साळवे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वृक्षारोपणासाठी सहभागी झाले होते.रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. आ. भरत गोगावले यांनी गड विकासाच्या कामात आयुक्त देशमुख यांनी पुढाकार घेतल्याने ५०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. महाराजांवरील श्रद्धेपोटी ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव पद नाकारून गडाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रभाकर देशमुख यांनी कोकण आयुक्तपद स्वीकारले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)२५,000 झाडे लावणार रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.