शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदिवासींच्या ५०० कोटींच्या ‘बिग बजेट’ची अधिकाऱ्यांना भुरळ

By admin | Updated: July 24, 2014 00:55 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या १३ जिल्ह्यातील आदिवासींसाठी असलेल्या ५०० कोटीच्या बिग बजेटने प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भुरळ घातली आहे. हे बिग बजेट ‘कॅश’ करण्यासाठी

‘एसीबी’चा ट्रॅप पथ्थ्यावर : अमरावतीच्या ‘एटीसी’पदासाठी पुन्हा रस्सीखेच राजेश निस्ताने - यवतमाळ विदर्भ-मराठवाड्याच्या १३ जिल्ह्यातील आदिवासींसाठी असलेल्या ५०० कोटीच्या बिग बजेटने प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भुरळ घातली आहे. हे बिग बजेट ‘कॅश’ करण्यासाठी प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड चढाओढ लागली आहे. राज्यात आदिवासी विभागाचे बजेट दोन हजार कोटींचे आहे. ते अमरावती, नाशिक, नागपूर आणि ठाणे या चार एटीसींमध्ये विभागले जाते. ५०० कोटीचे बजेट अमरावती येथील आदिवासी विकास खात्याच्या अपर आयुक्तांच्या (एटीसी) वाट्याला येते. त्यांच्या अधिपत्याखाली पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद, अकोला, धारणी अशी सात प्रकल्प कार्यालये आहेत. हे बजेट पाहूनच अन्य खात्यातील अधिकारी आदिवासी विभागाकडे आकृष्ट होतात. आजही मूळ आदिवासी विभागात बोटावर मोजण्याइतके अधिकारी शिल्लक आहेत. बहुतांश पदांवर कृषी, वने, पंचायत या खात्यातून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी ताबा मिळविलेला आहे. एटीसीच नव्हे तर पीओचे पदसुद्धा पटकाविण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा लागलेली असते. त्यात वनखाते आघाडीवर आहे. या पदावरील वर्णीसाठी कित्येकदा ‘रॉयल्टी’चा राजमार्ग निवडला जातो. अमरावतीचे एटीसी भास्कर वाळिंबे नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस येथील एका इमारत मालकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहआरोपी म्हणून एसीबीच्या जाळ्यात अडकले. या ‘ट्रॅप’साठी एका निलंबित कर्मचाऱ्याने महत्वाची भूमिका वठविल्याचे सांगण्यात येते. वाळींबेच्या अमरावती व ठाण्यातील घरातून सुमारे एक कोटी रुपयांची रोकड व ऐवज एसीबीने जप्त केला. बँक लॉकरची तपासणी अद्याप बाकीच आहे. भास्कर वाळिंबे हेसुद्धा रॉयल्टीच्या मार्गानेच आदिवासी खात्यात आले होते. त्यांचा ठाणे एटीसी पदावर डोळा होता. त्यासाठी तब्बल दीड वर्षे ते ‘आजारी’ रजेवर राहिले. परंतु ठाण्यात संधी न मिळाल्याने अखेर नाईलाजाने ते दोन वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये एटीसी म्हणून रुजू झाले. बाळिंबे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लवकरच त्यांच्या निलंबनाचे आदेशही जारी होतील. सध्या एटीसीचे पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदावर वर्णी लावून घेण्यासाठी पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. कृषी खात्यातील एका उच्च पदस्थाने नाशिक एटीसीसाठी फिल्डींग लावली आहे. तेथे सेवा वर्ग करण्यासाठी या अधिकाऱ्याला नाहरकत प्रमाणपत्रही कृषी खात्याने दिले. नाशिकसाठी वेटींगवर असताना या अधिकाऱ्याने अमरावतीत पुनर्वसन होते का, यादृष्टीने चाचपणी चालविली आहे. वित्त खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारीसुध्दा मोर्चेबांधणी करीत असल्याची माहिती आहे.