शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प

By admin | Updated: November 13, 2014 00:58 IST

वेतनवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विविध बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प झाला.

संप यशस्वीतेचा संघटनांचा दावा : वेतनवाढीची मागणीनागपूर : वेतनवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विविध बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प झाला. धनादेशांचे क्लिअरिंग आणि नियमित व्यवसायाला फटका बसला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात १२ नोव्हेंबरला झालेल्या एक दिवसीय अखिल भारतीय संपामुळे नागपुरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार ठप्प राहिले. नागपूर चॅप्टर आॅफ यूएफबीयू अंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा येथील सार्वजनिक क्षेत्रातील शाखा येतात. १ नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित वेतन करारासाठी संपाचे आवाहन करण्यात आले. युनियन्सचे संयोजक रामकुमार गुप्ता यांनी सांगितले की, अखिल भारतीय बँक महासंघाच्या वेळकाढू धोरणामुळे संप करावा लागला. सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या बँकांसमोर निदर्शने केल्यानंतर बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रित झाले आणि व्यवस्थापनाविरोधात घोषणा दिल्या. ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशचे अध्यक्ष आणि संयोजक राजकुमार गुप्ता यांनी सभेचे संचालन केले. सभेत एआयबीईएचे बी.एन.जे. शर्मा, एआयबीओसीचे डी.एस. मिश्रा, एनसीबीईचे मनोहर अगस्ती, बीईएफआयचे व्ही.व्ही. असाई, एआयबीओएचे पी.एस. कोहळे, आयएनबीईएफचे नागेश दंडे, एनओबीडब्ल्यूचे राजीव पांडे, प्रकाश सोहनी व अशोक जुननकर, एआयआरबीएफचे ओ.पी. वर्मा, डी.एस. लहाने, अभयसिंग यांनी सभेत मार्गदर्शन केले. यावेळी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी रमेश देशपांडे, सुरेश बोबाटे, सुधीर कुडुले, स्वयंप्रकाश तिवारी, गुणवंत बुजाडे, वंदना मजूमदार, विद्या जोशी, प्रदीप गौर, पी.जी. मेश्राम, अरविंद कुराडकर, मिलिंद वासनिक, अशोक अतकरे, विजय ठाकूर, किशोर बिरेवार, दर्शन नायडू, मालिनी दळवी, ब्रिजबाला दिद्दी, दिलीप पोटले, सत्यशील रेवतकर, जयवंत गुर्वे, सुरभी शर्मा, वीरेंद्र गेडाम, चेंडिल अय्यर, सुरेश सेलूकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)