शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात ५०० च्या बनावट नोटा

By admin | Updated: August 6, 2014 01:10 IST

शहरात मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका बँकेत एकाच दिवशी वेगवेगळ्या

नागरिकांमध्ये भीती : बँकेत उघडकीसवरोरा : शहरात मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका बँकेत एकाच दिवशी वेगवेगळ्या ग्राहकांजवळ सहा ५०० च्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित सर्व ग्राहक बँकेचे खातेदार असून ते व्यावसायिक आहेत. हे खातेदार बँकेत रक्कम जमा करीत असताना बनावट नोटांची बाब रोखपालाच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. वरोरा परिसरात मागील काही दिवसांपासून ५०० च्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा केली जात होती. एखादी ५०० ची नोट बनावट आढळल्यास नागरिक पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ती नोट आपल्याजवळ ठेवत असत. दरम्यान, शहरातील काही एटीएम मशीनमधूनही पाचशेच्या बनावट नोटा निघाल्याचे सांगण्यात येते. मात्र याच नोटा बँकही स्वीकारण्यास नकार देत असल्याने ग्राहक हा प्रकार निपूटपणे सहन करुन घेत होते. शहर व ग्रामीण भागातील व्यावसायिक दिवसभरातील आपला व्यवसाय सांभाळून दुपारी किंवा सायंकाळी बँकेत रोख रक्कम जमा करतात. असेच काही व्यावसायिक सोमवारी बँकेत रोख रक्कम जमा करण्याकरिता गेले असता, वेगवेगळ्या ग्राहकांजवळील नोटांच्या बंडलमध्ये पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा आढळून आल्या. रकमेची मोजणी करताना रोखपालाच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे रोखपालाने सदर नोटा घेण्यास नकार दिला. त्याचा फटका या व्यावसायिकांना बसला. अनेक व्यावसायिक ५०० रुपयांची बनावट नोट आढळल्यास व रोखपालने ती स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याऐवजी दुसरी नोट देऊन बनावट नोट परत घेऊन निघून जातात. बँकेत बनावट नोट प्राप्त झाल्यास रोखपाल त्यावर लाल अक्षराने रेषा मारत असल्याने सदर नोट पुन्हा चलनात येत नाही. परंतु याबाबत चौकशीचा ससेमीरा लागत असल्याने बँक किंवा व्यावसायिक व नागरिकही पोलिसांकडे याबाबत तक्रार करीत नसल्याने बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. (तालुका प्रतिनिधी)