शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

५०० ते १५०० रुपयांनी टीव्ही, फ्रीजच्या किमती वाढणार !

By admin | Updated: May 21, 2017 02:41 IST

जीएसटी या नवीन करप्रणालीत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. परिणामी, जीएसटी लागू झाल्यानंतर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन,

- लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद :जीएसटी या नवीन करप्रणालीत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. परिणामी, जीएसटी लागू झाल्यानंतर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हनच्या किमती सुमारे ५०० ते १५०० रुपयांनी वाढतील. यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे डीलर्स पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावर सध्या व्हॅट व उत्पादन शुल्क मिळून २५ टक्के कर आकारण्यात येत आहे. जीएसटीमध्ये २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. ३ टक्क्यांनी करवाढ झाल्याने त्याचा निश्चित परिणाम या उपकरणांच्या किमतीवर होणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार उदाहरणार्थ २० ते २५ हजार रुपयांदरम्यानच्या एलईडी टीव्ही ७५० रुपयांनी तर ४० ते ५० हजार रुपयांचा एलईडी टीव्ही १५०० रुपयांनी महाग होईल. १५ ते २० हजार रुपयांदरम्यानचा सिंगल डोअर फ्रीज ५०० ते ८०० रुपये, तर २५ ते ४० हजार रुपयांदरम्यानचा डबलडोअर फ्रीज १२०० ते १५०० रुपयांनी वाढेल. १५ ते २५ हजार रुपयांचा वॉशिंग मशीन ८०० ते १ हजार रुपयांदरम्यान तर मायक्रोओव्हन ६०० ते ८०० रुपयांदरम्यान भाव वाढतील. २५ ते ४० हजार रुपयांदरम्यानच्या एसीमध्ये १२०० ते १५०० रुपयांनी भाववाढ होईल. येत्या काळात किमती समान ठेवण्यासाठी काय निर्णय घेतात, यावर सर्व अवलंबून आहे. देशपातळीवर सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या एकसमान किमती असतील.