शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाण्यात ५० टक्के कपात - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: April 26, 2016 18:13 IST

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील दारू उद्योगांची बुधवारपासून ५० टक्के पाणीकपात करण्याचे आंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज प्रशासनाला दिले.

इतर उद्योगांचीही २० टक्के पाणी कपात
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २६ -  : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात २७ एप्रिलपासून ५० टक्के आणि १० मे ते १० जूनपर्यंत आणखी १० टक्के म्हणजे एकूण ६० टक्के पाणी कपात करावी, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी मंगळवारी राज्य शासनास दिले. या कपातीमधून वाचणारे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

शिवाय इतर उद्योगांचीही बुधवारपासून २० टक्के आणि १० मेपासून १० जूनपर्यंत आणखी ५ टक्के म्हणजे एकूण २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उरणाऱ्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागीय आयुक्तांनी करावे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी वाटपाबाबत देखरेख करावी. १० जूनपर्यंत याचा अहवाल दर आठवड्यास उच्च न्यायालयाचे प्रबंधक आणि सरकारी वकील यांच्याकडे सादर करावा, असेही आदेश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी १० जून २०१६ रोजी होणार आहे. कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. राज्य पाणी धोरण २०११ नुसार महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरविण्याचा आदेश राज्य शासनास देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. तसेच मद्याच्या (दारूच्या) दुष्परिणामांचा विचार करून मद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि सेवन थांबविण्यासाठी परिणामकारक कायदा करण्याचे, विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन करून राज्यातील बेकायदेशीर मद्य उत्पादन, विक्री, वितरण आणि सेवन थांबविण्याचे, त्याचप्रमाणे २३ फेब्रुवारी २००५ च्या शासन निर्णयानुसार यासंदर्भात कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश द्यावेत आदी विनंत्या याचिकाकर्त्याने केल्या आहेत. सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील ज्या जिल्ह्यांत पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यांना पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केली होती. 

‘लोकमत’ ने केला पाठपुरावाएकीकडे संपूर्ण महाराष्ट्र भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना औरंगाबादेतील मद्य कंपन्यांमध्ये दारू, बीअर बनविण्यासाठी जायकवाडीतील पिण्याच्या पाण्याचा महापूर आलेला आहे, हे वृत्त ‘लोकमत’ने ७ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले. महसुलाच्या मोहापोटी शासन मद्य कंपन्यांच्या पाणी कपातीकडे कसे दुर्लक्ष करीत आहे, हेही ‘लोकमत’ने समोर आणले होते. ‘लोकमत’च्या या मालिकेचे राज्यभरात पडसाद उमटले. विरोधकांनी आंदोलने केली. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या