शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के लावण्या पावसाअभावी रखडल्या

By admin | Updated: July 12, 2017 02:49 IST

भात लावण्यांकरिता शेतात पाणी नसल्याने रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात लावण्या रखडल्या आहेत.

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पावसाचा जोर गेल्या आठ दिवसांपासून असल्याने, भात लावण्यांकरिता शेतात पाणी नसल्याने रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात लावण्या रखडल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत. भात लावण्यांकरिता शेतात पाणी असावे लागते, पावसाअभावी शेते कोरडी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी जवळचे ओढे आणि विहिरींचे पाणी शेतात घेऊन भात लावण्या केल्याने, जिल्ह्यात ५० टक्केच भात लावण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत; परंतु येत्या दोन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतातील पाणी आटून लावणी केलेली भातरोपे करपण्यास सुरुवात होण्याचा धोका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भात पेरण्या, भातरोपे आणि लावण्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अहवालातून नेमकी काय परिस्थिती आहे, याचे चित्र बुधवारी जिल्हास्तरीय कृषी बैठकीत स्पष्ट होईल. दरम्यान, अलिबाग व मुरुड तालुक्यातील दुबार भात पेरण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे अलिबागचे कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी यांनी सांगितले, तर महाड, पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन या चार तालुक्यांतही दुबार पेरणीची गरज नसल्याचे महाडचे कृषी अधिकारी व्ही. आर. साळवी यांनी सांगितले. प्राथमिक उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात दुबार भात पेरण्यांची गरज नसल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. डी. शिगेदार यांनी सांगितले.जिल्ह्यातील १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या अपेक्षित आहेत. त्याकरिता आवश्यक भातरोपांची निर्मिती ३५ हजार हेक्टरांवरील भात पेरण्यामधून होत आहे. सद्यस्थितीत भातरोपे चांगली व दमदार झाली आहेत. मात्र, पावसाने अधिक ओढ दिल्यास या भातरोपांना धोका आहे. दुबार भात पेरण्याचे संकट सद्यस्थितीत रायगडमध्ये नसले तरी येत्या चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर लावणी केलेली भातरोपे करपण्याची भीती आहे. अशाप्रकारे भातरोपे करपल्यास पुन्हा भात पेरण्या करून भातरोपांच्या निर्मितीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते, अशी भीती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी व्यक्त केली आहे. >शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावेजिल्ह्यात गतवर्षी जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते, ते यंदा १००१.२८ झाले आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्रावर आलेल्या पावसाने ओढ दिली होती; परंतु २१ जून रोजी आलेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाला. परिणामी, भात पेरणीअंती भातरोपांची उगवण उत्तम झाली आणि भात लावण्या ५० टक्के पूर्ण होऊ शकल्या; परंतु ५ जुलै रोजी आलेल्या पुनर्वसू नक्षत्रांच्या पावसाने मात्र पुन्हा ओढ दिल्याने उर्वरित ५० टक्के भात लावण्या अडचणीत आल्या आहेत. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्राचा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे; परंतु तोपर्यंत भातरोपे वाचविण्यासाठी पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागेल, असा पर्जन्य अंदाज नक्षत्र-पर्जन्य अभ्यासक डॉ. संजय टिळक यांनी व्यक्त केला आहे.