शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

By admin | Updated: December 1, 2015 02:14 IST

यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास

अकोला : यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ३५ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. मूग, उडीद हातचे गेले, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता कापसाचे उत्पादनही कमी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अल्प संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती; परंतु जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत परतीचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय संरक्षित ओलितासाठीचे पाणी संपत आल्याने ४६ टक्के शेतकऱ्यांचे जवळपास ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाले. यावर्षी परिस्थिती जास्तच भीषण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अत्यंत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. दरम्यान, विदर्भात सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सरासरी १२ ते १५ क्विंटल आहे. यावर्षी हे उत्पादन हेक्टरी दीड ते २ क्ंिवटलपर्यंत मिळाले आहे. राज्यात सोयाबीनखालील क्षेत्र जवळपास ३८ लाख हेक्टर आहे. यातील विदर्भात हे क्षेत्र १९ ते २० लाख हेक्टरपर्यंत आहे. मागील वर्षी विदर्भात १९ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादन जवळपास ७५ लाख क्ंिवटलपर्यंत पोहोेचले होते. यावर्षी प्रतिकूल हवामान व वातावरण असल्याने विदर्भात १६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु वातावरणाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा हेक्टरी दीड ते २ क्ंिवटल आला आहे. हजारो शेतकऱ्यांना तर एकरी २० ते ५० किलोचा उतारा आला आहे. त्यामुळे यावर्षीचे उत्पादन ३० ते ४० लाख क्ंिवटलच्या आतच असून, बहुसंख्य शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान पावसाच्या अनियमिततेचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, ४६ टक्के शेतकऱ्यांचे ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने परिस्थिती प्रतिकूल आहे. - डॉ. एन.एम. काळे, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.