शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम उपनगरांतील बिल्डरकडे ५० लाखांची खंडणी

By admin | Updated: July 22, 2016 03:21 IST

बांधकाम व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी देण्यासाठी वारंवार धमकाविणाऱ्या दोघा तरुणांना खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली

मुंबई: पश्चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी देण्यासाठी वारंवार धमकाविणाऱ्या दोघा तरुणांना खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. हर्षल मनोहर आग्रे (वय २७) आणि सुमीत सत्यनारायण पालमपुरा (२०, दोघे रा. सांताक्रुझ पश्चिम) अशी त्यांची नावे आहे. आग्रे हा कुरियर बॉयचे काम करत असून दोन वर्षांपूर्वी बिल्डरकडे आॅफिस बॉय म्हणून कामाला होता. पैशांची गरज असल्याने त्याने खंडणीचा डाव रचला होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कांदिवली परिसरातील एका प्रतिष्ठित बिल्डरची पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात त्यांना एक कॉल आला. आपले नाव छोटे सांगून ‘५० लाख दे, नाहीतर ठार मारू’, असे त्याने धमकावले. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना वारंवार वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमक्या दिल्या. त्यामुळे बिल्डरने त्याबाबत खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला. विलेपार्ले येथील नेहरू रोडवरील एका हॉटेलजवळ त्याला बोलविण्यात आले. बिल्डरकडून पैसे स्वीकारत असताना त्यांना दोघांना अटक करण्यात आली.मनोहर आग्रे हा कुरियर बॉयचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी तो बिल्डरकडे कामाला होता. मात्र त्यानंतर नोकरी सोडून एका कुरियर कंपनीत कामाला लागला. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न झाल्यानंतर तो वर्सोवा येथे स्वतंत्र राहू लागल्यानंतर खर्चाला पैसे कमी पडू लागले. त्यामुळे त्याने पालमपुराला सोबत घेवून बिल्डरकडे पैसे मागण्याचा फ्लॅन आखला. त्यांच्या कामाची पद्धत व अन्य सर्व बाबी कुटुंबीयांना माहित होत्या. त्यानुसार दोघे त्यांना पैशांसाठी फोन करत होते. मनोहरचा साथीदार सुमीत हा शिक्षण घेत असून त्याला झटपट पैसे मिळविण्याचे अमीष दाखवित त्याने कटात सामील करून घेतले होते. (प्रतिनिधी)