शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना ५० लाखांचा विशेष निधी!

By admin | Updated: January 16, 2015 05:48 IST

राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असताना विधानसभा सदस्यांना स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असताना विधानसभा सदस्यांना स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याचा निर्णय वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. मावळत्या सरकारने जाता जाता सर्व २८८ आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. त्याव्यतिरिक्त हे ५० लाख दिले जाणार आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीवर १४४ कोटींचा बोजा पडणार आहे.चालू वर्षाचे बजेट संपण्यासाठी अवघे अडीच महिने बाकी असून सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. पगारावर मोठा खर्च होत आहे; विकासकामांना निधी नाही अशा बिकट अवस्थेत नव्या सरकारने आमदारांना ही नववर्षाची भेट दिली आहे. यासाठीचा शासन निर्णय मकरसंक्रांतीच्या दिवशी काढण्यात आला आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावताना गेल्या विधानसभेतील सर्व आमदारांनी मिळालेला सगळा वार्षिक निधी आॅक्टोबरपूर्वीच खर्ची पाडला. त्यामुळे नव्या आमदारांच्या पदरात आर्थिक वर्ष संपेपर्यंत काहीही आले नव्हते. आता अखेर प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी त्यांच्या पदरी पडला असला तरी तो ३१ मार्चच्या आत खर्च करावा लागणार आहे. दहा लाखांच्या वरचे काम ई-निविदा काढल्याशिवाय करता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावून सांगितलेले आहे. तरीही काहींनी कामांचे तुकडे पाडून आवडीच्या ठेकेदारांना कामे देण्याची तयारी सुरू केली आहे. वेळ कमी असल्यामुळे कामांचा दर्जा कसा राखला जाईल याची कोणतीही शाश्वती नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र आमदार या निधीमुळे खूष आहेत.