शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देवल क्लबला ५० लाखांची देणगी

By admin | Updated: September 9, 2015 00:26 IST

ज्योत्स्ना टेंबे यांची मदत : नाट्यगृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण करणार

कोल्हापूर : रागांच्या लक्षणगीतांचे रचनाकार, नाट्यसंगीताला रागदारी संगीताचे वळण देणारे संगीतकार, अग्रणी कलावंत आणि कलाक्षेत्रातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेले रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पणती ज्योत्स्ना टेंबे-खांडेकर यांनी गायन समाज देवल क्लबला ५० लाखांची देणगी दिल्याची माहिती देवल क्लबचे पदाधिकारी श्रीकांत डिग्रजकर व पंडित सुधीर पोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गोविंदराव टेंबे यांचा आणि देवल क्लबचा स्थापनेपासूनचा ऋणानुबंध होता. त्यांनी ‘माझा संगीत व्यासंग’सारख्या ग्रंथाचे लेखन केले. चित्रपटसृष्टीत निर्मिती, संवाद, संगीत आणि अभिनय अशी उज्ज्वल कारकिर्द त्यांनी गाजविली. संस्थेची जुना देवल क्लब येथील वास्तू उभारली तेव्हा टेंबे हे देवल क्लबचे संचालक होते. येथील मैफलींत ते संगीतसेवा देत. या क्लबशी असलेला हा ऋणानुबंध लक्षात घेऊन प्रस्तावित नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी ज्योत्स्ना टेंबे यांनी ही देणगी संस्थेला दिली आहे. या रकमेतून नाट्यगृहाचे व्यासपीठ, देवल क्लबच्या मुख्य प्रवेशद्वाराची कामे करण्यात येणार आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ज्योत्स्ना टेंबे या एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. आपल्या पणजोबांनी कलाक्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचे कायम स्मरण राहावे, त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, या इच्छेने त्यांनी सगळी जमापुंजी देवल क्लबला दिली आहे. गोविंदराव टेंबे यांचे योगदान कायम स्मरणात राहावे यासाठी संस्थेच्या नाट्यगृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण करण्यात येणार आहे. परिषदेस प्रभाकर वर्तक, अरुण डोंगरे, डॉ. वासंती टेंबे, दिलीप गुणे, राजेंद्र पित्रे, सुबोध गद्रे, उमा नामजोशी उपस्थित होत्या. पुढील वर्षी सोहळाअमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ज्योत्स्ना टेंबे यांच्या उपस्थितीत २ व ३ जानेवारी २०१६ रोजी नाट्यगृहाच्या नामकरणाचा सोहळा होणार असून, याच वेळी गोविंदराव टेंबे यांच्या योगदानावर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.