शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमुळे ५० व्यवसाय अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 02:10 IST

मोबाइलने माहितीतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाली. सर्वसामान्यांच्या मुठीमध्ये जग आले. मात्र, याच मोबाइलने ५०पेक्षा अधिक व्यवसाय अडगळीत टाकले. काही व्यवसायिकांनी काळासोबत

- प्रशांत तेलवाडकर,  औरंगाबादमोबाइलने माहितीतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाली. सर्वसामान्यांच्या मुठीमध्ये जग आले. मात्र, याच मोबाइलने ५०पेक्षा अधिक व्यवसाय अडगळीत टाकले. काही व्यवसायिकांनी काळासोबत राहून दुसऱ्या व्यवसायात उडी घेतली म्हणून ते तरले.मोबाइल आता नुसता संवाद साधण्यापुरता मर्यादित राहिला नसून तो आता मल्टीयुजर बनला आहे. हँडसेटमध्येच टेलिफोन डायरी, घड्याळ, कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देण्यात आल्याने बाजारात या वस्तूंच्या मागणीवर विपरीत परिणाम झाला आहे. हँडसेटमध्येच कॅमेरा असल्याने बाजारातील डिजिटल कॅमेऱ्याचा उठावदेखील घटला आहे. फोटो अल्बम, ग्रिटिंग कार्ड, टॉर्च, व्हिडीओ गेम, कार्टून, स्टोरी बुक, डिक्शनरी, पाकशास्त्रावरील पुस्तके, नकाशे आदींवर परिणाम झाला आहे.फोटोग्राफर लग्नसराई समारंभापुरतेच...पूर्वी वाढदिवस, घरगुती समारंभात व्यावसायिक फोटोग्राफरला मोठी मागणी होती. पण मोबाइलमध्येच उच्च दर्जाचा कॅमेरा उपलब्ध झाल्याने, प्रत्येक मोबाइलधारक फोटोग्राफर झाला आहे. मोबाइलमधूनच व्हिडीओ शूटिंग केले जाते. समारंभापुरतेच व्यावसायिक फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग करणाऱ्यांचे महत्त्व राहिले आहे, असे फोटोग्राफर उमाकांत वैद्य यांनी सांगितले.पाच हजार व्यापाऱ्यांवर परिणाम जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठे २५ हजार व्यापारी आहेत. मोबाइलमुळे मागील ५ वर्र्षांत त्यातील जवळपास ५ हजार व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. मात्र, त्यातील काहींनी हा बदल स्वीकारत नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे.पूर्वी सीडी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता; पण मोबाइलमुळे या विक्रीवर एवढा परिणाम झाला की, आता सीडीच आऊटडेटेड झाल्या आहेत. यामुळे हा व्यवसाय बंद करून आम्ही रेडिमेड कपड्याच्या व्यवसायात पदार्पण केले. - नरेश फुलवाणी, व्यावसायिक

मोबाइलमुळे इंटरनेटद्वारे मेसेज पाठविणे सोपे झाले आहे. याचा मोठा परिणाम ग्रिटिंग विक्रीवर झाला आहे. अनेकांनी आपले जुने व्यवसाय बंद करून वेगळे व्यवसाय थाटले आहेत.- सुहास देशपांडे, ग्रिटिंग विक्रेता