शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

50-50 परीक्षाप्रणालीला महाविद्यालयांचा ब्रेक, नागपूर विद्यापीठ बॅकफूटवर

By admin | Updated: June 6, 2017 22:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ह्यड्रीमह्ण असलेल्या ५०-५० परीक्षा प्रणालीला

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ह्यड्रीमह्ण असलेल्या  ५०-५०  परीक्षा प्रणालीला परत एकदा हादरा बसला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रणालीच्या अंमलबजावणीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तूर्तास ही प्रणाली न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी विद्वत्त परिषदेने मान्यता दिल्यानंतर ६० : ४० परीक्षा प्रणालीचा प्रस्तावदेखील महाविद्यालयांच्याच विरोधामुळे मावळला होता.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यातच पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू झाल्यामुळे परीक्षा विभागावरील ताण प्रचंड वाढला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयांतदेखील परीक्षा सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत्त परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली होती. नवीन शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीची अंमलबजावणी करायची की नाही, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गैरव्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची मंगळवारी दीक्षांत सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी महाविद्यालयांसमोर या प्रणालीबाबत सादरीकरण केले. मात्र अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या प्रणालीबाबत नाराजीचा सूर लावला. या प्रणालीत एका सत्राची परीक्षा विद्यापीठ तर एका सत्राची परीक्षा महाविद्यालय घेईल, असे प्रस्तावित होते. अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. अशा स्थितीत महाविद्यालयांचे काम प्रभावित होईल व प्राध्यापकांना दुप्पट काम करावे लागेल. शिवाय ग्रामीण भागांमध्ये महाविद्यालयांवर पेपर  मॅनेज  करण्याबाबत दबाव येईल, अशा आशयाची कारणे यावेळी प्राचार्यांकडून मांडण्यात आली. महाविद्यालयांकडून येणारा एकूण नकारार्थी सूर लक्षात घेता, संबंधित प्रणाली तूर्तास लागू न करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला.